योजना
Age Mr| मुख्यमंत्री वयोश्री योजना: ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक आणि मानसिक मदत|
Age Mr| पुणे, 23 जुलै 2024: राज्यातील 65 वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आणि मानसिक मदत पुरवण्यासाठी राज्य सरकारने “मुख्यमंत्री वयोश्री योजना” सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेऊन ज्येष्ठ नागरिक वयोमानपरत्वे (By age) होणाऱ्या आरोग्य समस्यांवर मात करून, अधिक चांगले जीवन जगू शकतील.
योजनेचे फायदे:
- आर्थिक मदत: पात्र लाभार्थ्यांना एकरकमी 3 हजार रुपये दिले जातील.
- सहाय्यक साधने आणि उपकरणे: चष्मा, श्रवणयंत्र (Hearing aid) , व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, आणि इतर अनेक साधने आणि उपकरणे खरेदीसाठी आर्थिक मदत.
- मानसिक आरोग्य: योगोपचार आणि मनःस्वास्थ्य केंद्रांमधून मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत.
पात्रता:
- महाराष्ट्रातील रहिवासी (resident) असणे.
- वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक.
- वार्षिक कुटुंब उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी.
- दिव्यांग किंवा दुर्बलताग्रस्त असणे.
- आधार कार्ड असणे आवश्यक.
- मागील 3 वर्षात कोणत्याही सरकारी योजनेतून विनामूल्य साधने न मिळाल्याची स्वयंघोषणा.
वाचा: Crop Loan| केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कर्जावर जास्त व्याज द्यावे लागणार
अर्ज कसा करावा:
- पुणे येथील सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात विहित अर्ज भरा.
- आवश्यक कागदपत्रे सोबत द्या.
- अर्ज स्वीकारल्यानंतर 30 दिवसांमध्ये निवड झालेल्यांना 3 हजार रुपये बँक खात्यात जमा केले जातील.
हे लक्षात घ्या:
- ही योजना केवळ दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे.
- प्रत्येक जिल्ह्यात निवडक लाभार्थ्यांची संख्या मर्यादित आहे.
- अधिक माहितीसाठी, सहायक (assistant) आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, पुणे यांच्याशी संपर्क साधा.