योजना
New opportunity| मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना: तरुणांसाठी नवी संधी|
New opportunity| मुंबई, 19 जुलै 2024: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आग्रहावरून (by insistence) शिंदे सरकारने अखेर तरुणांसाठी “मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना” जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेऊन राज्यातील तरुण स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकता क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात.
योजनेचे लाभ:
- आर्थिक मदत: बारावी उत्तीर्ण उमेदवारांना ₹6,000, ITI-पदवीधर उमेदवारांना ₹10,000 आणि पदवीधर/पदव्युत्तर उमेदवारांना ₹10,000 ची आर्थिक मदत दिली जाईल.
- कौशल्य विकास प्रशिक्षण: विविध क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्याची संधी.
- रोजगार मार्गदर्शन: रोजगार आणि उद्योजकतेच्या संधींसाठी मार्गदर्शन (Guidance) आणि सहाय्य.
पात्रता:
- महाराष्ट्राचा रहिवासी असणे.
- वय 18 ते 35 वर्षे.
- किमान शैक्षणिक पात्रता: बारावी, ITI, पदवी किंवा पदव्युत्तर.
- आधार कार्ड आणि बँक खाते असणे.
वाचा: BSNL Next| बीएसएनएल विरुद्ध जिओ: डेटा आणि वैधतेच्या बाबतीत बीएसएनएल पुढे|
अर्ज कसा करावा:
- कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या या संकेतस्थळावर नोंदणी करा.
- आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करा.
- निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण (Training) आणि आर्थिक मदत दिली जाईल.
महत्वाचे मुद्दे:
- एका व्यक्तीला या योजनेचा लाभ एकदाच मिळू शकेल.
- प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन थेट बँक खात्यात (DBT) जमा केले जाईल.
- अधिक माहितीसाठी, https://pmmodiyojana.in/ladka-bhau-yojana/ या संकेतस्थळाला भेट द्या.