Tech

Electric Car | आता स्कूटरच्या पैशात घरी आणा इलेक्ट्रिक कार; देशात सर्वात स्वस्तात मस्त कार लॉन्च, किंमत आहे फक्त…

Electric Car | इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. कमी धूर, कमी आवाज आणि कमी खर्च यामुळे इलेक्ट्रिक वाहने लोकांना आकर्षित करत आहेत. मात्र, इलेक्ट्रिक कारची (Electric Car) किंमत अजूनही परवडणारी नाही. अशावेळी याकुजा करिश्मा इलेक्ट्रिक कार तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय ठरू शकते. याकुजा करिश्मा इलेक्ट्रिक कार ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार (Cheapest Electric Car ) आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत फक्त 1.79 लाख रुपये आहे. ही कार 3 सीटर आहे आणि एका चार्जमध्ये 50-60 किलोमीटर अंतर कापण्यास सक्षम आहे.

काय आहेत फीचर्स?
या कारमध्ये 60v42ah ची पॉवर बॅटरी वापरण्यात आली आहे. या बॅटरीला पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 6-7 तास लागतात. कारची टॉप स्पीड 50-80 किलोमीटर प्रति तास आहे. कारच्या इंटीरियरमध्ये एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी फॉग लॅम्प, ब्रॉड ग्रिल, क्रोम डोअर हँडल, कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प, पॉवर विंडो, बॉटल होल्डर यासारखी वैशिष्ट्ये आहेत.

वाचा : Electric Tractor | नादचखुळा! शेतकऱ्यांसाठी बाजारात येणार इलेक्ट्रिक, हायड्रोजन चलित ट्रॅक्टर; होणार मोठा फायदा

देशात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च
याकुजा करिश्मा इलेक्ट्रिक कार हरियाणातील सिरसा येथे असलेल्या एका इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनीने बनवली आहे. कंपनीने ही कार देशभरातील 100 हून अधिक शहरांमध्ये लॉन्च करण्याचे नियोजन केले आहे. इलेक्ट्रिक कार खरेदी करायची पण बजेट कमी आहे, अशा लोकांसाठी ही कार परफेक्ट पर्याय ठरू शकते. या कारची किंमत, वैशिष्ट्ये आणि परफॉर्मन्स पाहता ही कार खरेदी करण्यास नक्कीच फायदेशीर ठरेल.

Web Title: Now bring home an electric car for scooter money; Cheapest cool car launch in the country, see what is the price?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button