कृषी बातम्या

दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी तरुणाने वापरली स्वस्त आणि मस्त शक्कल! तुमच्या पिकासाठी उपयुक्त ठरेलं हि शक्कल…

Cheap and cool shackles used by the youth to avoid the crisis of double sowing! Read the shackles that are useful for your crop

धुळे : शिरपूर (Shirpur) तालुक्यातील रोहिणी भोईटी (Rohini Bhoiti) या गावातील शेतकऱ्यांनी सुरुवातीला झालेल्या पावसानंतर आपल्या शेतात पेरणी केली, परंतु अनेक वाट पाहून देखील पावसाने हजेरी लावली नाही म्हणून येथील तरुणाने दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी तरुण शेतकऱ्याने एक शक्कल लढविली आहे. (Dhule Farmer Vinesh Pavara supply water by plastic bag due to lack of rain) या युक्तीच्या मदतीने त्यांनी पीक वाचवण्याचं प्रयत्न केला.

हे ही वाचा : आत्ता येणार शेतकरी कायदा! ‘शेतकऱ्याची फसवणूक’ केल्यास होणार दंड व तीन वर्षाचा तुरुंगवास…

विणेश पावरा (Vinesh Pavara) या तरुण शेतकऱ्याने आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये कपाशीची (Of cotton) लागवड केली. परंतु त्यांच्या कल्पक बुद्धी त्यांनी पिकाला पाणी देण्याची व्यवस्था (Watering system) केली आहे.

त्यांनी एक एकर क्षेत्रामध्ये कपाशीची लागवड केली होती, पेरल्यानंतर कपाशीच्या बी मधून कोंब देखील बाहेर आल्याने शेतकऱ्याने प्रत्येक कपाशीच्या जवळ एका प्लास्टिकच्या (Of plastic) पिशवीमध्ये पाणी भरून त्या पिशवीला बारीक छेद करून त्यातून रोपाला जीवदान मिळेल इतके पाणी टिपटिप पिकाला मिळू लागले..

हे ही वाचा :घेवडा (राजमा) लागवडीबद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर…

हे ही वाचा : राज्यातील ‘या’ सहा जिल्ह्यांवर दुष्काळाचे संकट, यामध्ये तुमचा जिल्हा आहे का?

हा प्रयोग (Experiment) कितपत यशस्वी होईल हे त्यांना देखील माहीत नव्हते, परंतु प्रयत्नांना यश आले आणि आठ दिवसात हा प्रयोग यशस्वी ठरला पिशवी मधून मिळणाऱ्या थेंब-थेंब पाण्यामुळे कपाशीच्या बी मधून निघालेले कोंब काही इंच मोठे देखील झाले. तूर्तास दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी हा उपाय अत्यंत चांगला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, कोंब आलेले आलेले पिकांनायाद्वारे जीवनदान मिळाले, त्यानंतर काल व आज चांगला पाऊस पडलाकारणाने पीक अधिक उत्तम येण्यास सुरुवात झाली. तूर्तास तरी दुबार पेरणीचे (Double sowing) संकट टळलं असलं तरी यापुढेतरी राज्यामध्ये जोरदार पाऊस पडावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा :

1. ‘ट्रॅक्टर अनुदान योजनेचा’ अर्ज कसा भराल? पहा संपूर्ण माहिती एका क्‍लिकवर…

2. जाणून घ्या; “वांगी लागवड” विषयी संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button