कृषी सल्ला

जिल्हास्तरीय योजनेमध्ये बदल! पहा; शेळी आणि मेंढी यांचे सुधारित दर…

Changes in district level plan! See; Revised rates for goats and sheep

जिल्हास्तरीय (District level) योजनेमध्ये बदल करून शेळी-मेंढी सुधारित खरेदी दर मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याने पात्र व्यक्तींनी सुधारित योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास (Animal Husbandry and Dairy Business Development) मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) म्हणाले, सध्या चालत असणारी योजना सन 2011 मध्ये निश्चित केलेल्या दराप्रमाणे चालत असल्याकारणाने त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता होती म्हणून या योजनेत बदल केला गेला आहे. मागील दहा वर्षात दर वाढ झाली नसल्याकारणाने योजनेस योग्य प्रतिसाद मिळत नव्हता.

सदर योजना ग्रामीण भागातील मजूर, भूमीहीन शेतकरी (Landless farmers) तसेच अल्पभुधारक शेतकरी यांच्यासाठी स्वयंरोजगार मिळून देण्यासंदर्भात अत्यंत लाभदायक ठरणारी आहे.

या योजनेद्वारे शेळीपालन (Goat rearing) करण्याकरता प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस शेळी मेंढी मांसाच्या दरात झालेली वाढ लक्षात घेता, या सुधारित धरणामुळे निश्चितच पात्र व्यक्तींना फायदा होईल तसेच पसंतीनुसार शेळ्यांची पैदास (Breeding of goats) करणे सोयीस्कर ठरेल, अशी माहिती केदार यांनी दिली आहे.

या योजनांमधील शेळी/मेंढी वाडा, खाद्याची व पाण्याची भांडी, आरोग्य सुविधा (Health facilities) आणि औषधोपचार या उपघटकांना वगळण्यास मान्यता देण्यात आली आहे. विविध जातीच्या शेळ्या पूर्वी जिल्हानिहाय खरेदीची परवानगी देण्यात आली होती, परंतु सुधारित योजनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये (In Maharashtra) परवानगी देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाने (By the Cabinet) मान्य केलेले शेळी मेंढ्यांचे सुधारित दर:
शेळी- उस्मानाबादी / संगमनेरी 8,000 रुपये, शेळी-बेरारी, कोकणकन्या व स्थानिक जाती 6,000 रुपये, बोकड- उस्मानाबादी / संगमनेरी 10,000 रुपये, बोकड- बेरारी, कोकणकन्या व स्थानिक जाती 8,000 रुपये, मेंढी- माडग्याळ 10,000 रुपये, मेंढी- दख्खनी व स्थानिक जाती 8,000 रुपये, नर मेंढा-माडग्याळ 12,000 रुपये, नर मेंढा-दख्खनी व स्थानिक जाती 10,000 रुपये.

हे ही वाचा :
1 लॉकडाऊन उठलं शेतकऱ्यांच्या जीवावर! गारपिट पावसाचे आर्थिक नुकसान टाळणे करता करा ‘या’ उपाय योजना!

2)बघा, “पिक कर्ज” मिळण्याची संपूर्ण प्रोसेस फक्त एका क्लिकवर…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button