ताज्या बातम्या

ब्रेकिंग! “बाबासाहेब आंबेडकर…” वादग्रस्त वक्तव्यामुळे चंद्रकांत पाटलांवर शाईफेक, पाहा व्हिडिओ

Chandrakant Patil | अनेकदा राजकारणी नेते वादग्रस्त विधाने बोलून जातात. त्यानंतर प्रचंड मोठा गदारोळ निर्माण होतो. त्यामुळे जनतेच्या डोळ्यावर हे नेते येतात आणि थेट जनताच कायदा हातात घेऊन राजकीय नेत्यांना शिकवायचं ठरवते. आता नुकतच पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केला आहे.

चंद्रकांत पाटलांवर फेकली शाई
पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil video viral) कार्यक्रमासाठी येणार होते. त्यामुळे शेकडो पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी करण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने शाही फेक केली. त्यापूर्वी ते मोरेश्वर येथे चहा पिण्यासाठी थांबले होते. चहा पिल्यानंतर ते पुढे कार्यक्रमासाठी निघाले असता वेळ साधून अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर साई फेकली. ज्याचा व्हिडिओ तुम्ही खाली पाहू शकता.

केलं होतं वादग्रस्त वक्तव्य
खरं तर, चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याचं कारणामुळे विरोधक आक्रमक झाले होते. त्यानंतर सकाळी पिंपरीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये विविध पक्षांनी एकजूट होऊन आंदोलन करत चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध केला.

अज्ञात व्यक्तीला घेतल ताब्यात
त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेबांचा विजय असो असे अशी घोषणा देत चंद्रकांत पाटील यांच्या थेट तोंडावरच शाही फेक केली. तोंडावर शाळे फेक केल्यामुळे त्यांचा समतोल बिघडला आणि त्यांचा तोल जाता जाता थोडक्यात बचावला. यानंतर या अज्ञात व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Breaking! “Babasaheb Ambedkar…” Controversial Statement Chandrakant Patal Slammed, Watch Video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button