राज्यात पुढील 10 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता; शेतकऱ्यांकडून केली जातेय नुकसान भरपाईची मागणी..
मुसळधार पावसाची परिस्थिती पाहून शेतकरी (Farmers) हवालदिल झाला आहे. मुंबईमध्ये सुद्धा मोठा पाऊस झाला. राज्यात (In the state) सर्व भागांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज 20 सप्टेंबर रोजी विदर्भासह मुंबईमध्ये मोठ्या पावसाचा अंदाज (Rainfall forecast) वर्तविला आहे. बंगालच्या खाडीच्या वर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
वाचा –
विदर्भात सर्वाधिक पावसाचा अंदाज –
विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात देखील पावसाची शक्यता आहे. यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची (rain) शक्यता आहे. मुंबई शहरासह नवी मुंबई, पनवेल, पालघर, ठाणे जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.
वाचा –
राज्यात 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत सर्व ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता –
20 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचा अंदाज बांधला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात या भागातील सर्व ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. आगामी 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत राज्यात सर्व ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त बांधली आहे. पुढील काही दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
सोयाबीन, उडीद या पिकांचे नुकसान –
सोयाबीन, उडीद या पिकांचं (Crops) मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असताना पाहायला मिळत आहे. काढणीला आलेली पिकं (Crops) अनेक भागांमध्ये पाण्यात गेली आहेत. नुकसान पाहून शेतकरी (Farmers) नुकसान भरपाईची मागणी करत असल्याचे दिसत आहेत.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा