पुढील 4 दिवस महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता..
Chance of heavy rain with thunder in Maharashtra for next 4 days.
उत्तर भारतात (North India) हिवाळा सुरू झाला असताना दुसरीकडे दक्षिण भारतात पावसाने चांगलाच धमाकूळ घातला आहे. हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की 1 डिसेंबरपर्यंत भारतातील (india) 8 राज्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
वाचा –
1 डिसेंबर पर्यंत मुसळधार पाऊस –
भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिलेल्या माहिती नुसार, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, आंध्र प्रदेश आणि लक्षद्वीपमध्ये 1 डिसेंबरपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वाचा –
30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता –
तर महाराष्ट्र राज्यातही 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. यादरम्यान वारे जोरदार असण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व संलग्न मराठवाडा यामुळे प्रभावित होऊ शकतो, तसेच मुंबई ठाणे, पुणे सहीत. काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –