कृषी बातम्या

Electric Tractor | मोबाईलवरून नियंत्रित होणारा शेतकऱ्याने बनवला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, 4 तास चार्जिंगमध्येच चालतो तब्बल ‘इतके’ तास

सध्या इंधनाचे दर हे वारंवार गगनाला भिडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची कोंडी होत आहे. सतत या वाढत्या दरामुळे सामान्यांचे बजेट कोलमडत आहे.

Electric Tractor | पेट्रोल-डिझेलची (Petrol Diesel) दरवाढ न परवडल्यामुळे सामान्यांसाठी बाजारात अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार स्कूटर (Electric car scooter) लाँच केल्या. यामुळे सामान्यांच्या खिशावर पेट्रोल डिझेलची दरवाढ झाली तरी फारसा काही फरक पडणार नाही. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा फटका केवळ सामान्यांनाच बसतात नसून शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात बसत आहे. कारण शेतीमध्ये (Agriculture) ट्रॅक्टरने मेहनत करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. इंधनाच्या दरवाढीमुळे (Fuel price hike) शेतकऱ्यांना शेती मशागत करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिकाला फारसा भावही मिळत नाही. त्यामुळे या सर्वाचा परिणाम शेतकऱ्यांच्या खिशावर होतो. सततच्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा विचार करता तरुणाने थेट बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी बनवला आहे.

गुजरातमधील तरुणाने बनवला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर
सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भावात सतत चढ-उतार होत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरने मशागत करणे सोडून देत जुन्या पद्धतीने बैलाने मशागत करणे पसंत केले आहे. मात्र यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड शारीरिक कष्ट घ्यावे लागते. ट्रॅक्टरने मशागत करणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. यामुळेच आता गुजरातमधील एका तरुणाने शेतकऱ्यांसाठी थेट ‘इलेक्ट्रिक ट्रॅक्टर’ बनवला आहे. तरुणाने बनवलेल्या या ट्रॅक्‍टरची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा होत आहे.
हा तरुण 34 वर्षीय असून त्याचे नाव महेश आहे. त्याचबरोबर तो गुजरातमधील जामनगर या जिल्ह्यातील कलावड तालुका येथील पिप्पर गावातला रहिवासी आहे. हा तरुण एका शेतकरी कुटुंबातील आहे.

वाचा: Tractor Subsidy | शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी तब्बल 50 टक्के अनुदानासाठी शासनाची मंजुरी, ‘अशी’ प्रक्रिया केल्यावरच मिळणार लाभ

ट्रॅक्टरचे नाव व फीचर्स
• या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे नाव ‘व्योम’ आहे.
• ट्रॅक्टरची क्षमता 22 एचपी आहे.
• ट्रॅक्टर 72 वॅट लिथियम बॅटरीद्वारे चालतो.
• ट्रॅक्टरची बॅटरी उत्तम दर्जाची असल्याने सतत बदलण्याची आवश्यकता नाही.
• ट्रॅक्टरची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात.
• बॅटरी फुल चार्ज झाल्यानंतर त्यावर 10 तास इतके काम करू शकता.
• या ट्रॅक्टरचा वेग मोबाईलद्वारेही नियंत्रित करता येतो.
• ट्रॅक्टरमुळे कोणतेही प्रदूषण होत नाही.

वाचा: Subsidy | पिक संरक्षणाकरता शेतकऱ्यांना मिळणार कुंपणासाठी अनुदान, जाणून घ्या कोणती आहे ‘ही’ योजना

गुजरातमधील या तरुणाने आधुनिक पद्धतीचा वापर करून हा ट्रॅक्टर बनवला आहे. ज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. ट्रॅक्टरचा वेग हा मोबाईलद्वारे नियंत्रित करता येतो ही एक कमालीचीच बाब आहे. या ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांना पेट्रोल डीजल साठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत. केवळ चार तास चार्जिंग केल्यानंतर शेतकऱ्यांना या ट्रॅक्टरचा दहा तास वापर करता येणार आहे. हिच ट्रॅक्टरची महत्त्वाची आणि उपयुक्त खासियत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button