ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

केंद्र सरकारचा निर्णय : शेतकऱ्यांना मिळणार युनिक किसान आयडी नंबर! या आयडी नंबरचा शेतकऱ्यांना काय उपयोग होणार?

Central government's decision: Farmers will get unique Kisan ID number! How will this ID number be useful to the farmers?

केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Union Ministry of Agriculture) शेतकऱ्यांसाठी युनिक किसान आयडी नंबर घेण्याचा निर्णय घेतला आहे, याद्वारे शेतीक्षेत्र मधील डिजिटलायझेशन (Digitization) करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, याद्वारे शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती एका डेटाबेसमध्ये नोंदवण्यात येणार आहे. ज्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना भविष्यासाठी उपयुक्त ठरेल.हेही वाचा :

हेही वाचा : उसाच्या शेतीला द्या,” ह्या” नवीन पद्धतीने पाणी वाचेल वेळ आणि पैसा…

[metaslider id=4085 cssclass=””]

केंद्र सरकारने (Central Government) आतापर्यंत पाच कोटी शेतकऱ्यांचा डेटाबेस (Database) तयार केला असून, येते काही काळामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. शेती क्षेत्र हा अर्थव्यवस्थेचा (Of the economy) मजबूत कणा आहे, त्यामुळे कोरोना सारख्या कठीण परिस्थितीमध्ये लढून संकटावर विजय करण्याची ताकद ग्रामीण भागातील शेतकरी आणि लोकांमध्ये आहे. त्यामुळे केंद्र सरकार शेतकऱ्यांना युनिक किसान आयडी (Unique Farmer ID) देणार आहे.

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या युनिक आयडी मुळे डाटाबेसच्या आधारे शेतकऱ्यांना कोणत्या पिकाची पेरणी करायची, कोणत्या प्रकारचे बी बियाणे वापरायचं कधी लागवड करावी, त्याची कापणी करावी याबाबत मार्गदर्शन केले जाईल.

हेही वाचा : खतांवरील अनुदान कसे मिळवावे? अनुदान मिळण्याकरिता आवश्यक आहेत ही कागदपत्रे जाणून घ्या

तसेच असा डाटाबेस असल्यास वेगवेगळे योजना (Plan) शेतीसंबंधी विविध विकास योजना सुरु करण्याबाबत सरकारला या डाटाबेसची मदत होणार आहे. जसे की पी एम किसान सन्मान योजना,(PM Kisan Sanman Yojana) प्रधानमंत्री पिक विमा योजना(Pradhan Mantri Pik Vima Yojana ) या संबंधित असलेल्या उपलब्ध माहितीच्या आधारे डाटा एकत्रित करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल साठवायचा आहे किंवा विकायचा आहे, कुठे कोणत्या किमतीला विक्री करायची आहे या संबंधी माहिती या डाटाबेसच्या आधारे उपलब्ध होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनामध्ये तंत्रज्ञानाचा विकास करणे, शेतकऱ्यांना अधिक चांगले जीवनमान मिळवून देण्यासाठी, व त्यांचा विकास व प्रगती करण्यासाठी या डिजिटलायझेशन ची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा :

1)कांद्याला मिळतोय 2200 रुपये पर्यंत बाजार भाव

2)आधार कार्ड संबंधी अडचण आहे, ‘इथे’ करा तक्रार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button