LPG Gas Subsidy | सामान्यांसाठी खुशखबर! एलपीजी सिलेंडरवर ‘इतक्या’ रुपयांची सबसिडी जाहीर, केंद्र सरकारची मोठी घोषणा
.
LPG Gas Subsidy | पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोदी सरकारने मोठी भेट दिली आहे. सरकारने 9.60 कोटी लाभार्थ्यांसाठी अनुदानाचा (LPG Gas Subsidy) कालावधी एका वर्षासाठी वाढवला आहे. म्हणजेच आता पुढील एक वर्षासाठी त्यांना प्रति सिलिंडर 200 रुपये अनुदान मिळत राहणार आहे. लाभार्थी एका वर्षात एकूण 12 एलपीजी (lpg) सिलिंडरवर सबसिडी (LPG Gas ) घेऊ शकतात. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली आहे.
थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते सबसिडी
मे 2022 मध्ये सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रति गॅस सिलेंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी जाहीर केली होती. अनुराग ठाकूर म्हणाले की, “या पाऊलामुळे सरकारला 2022-23 मध्ये 6,100 कोटी रुपये आणि 2023-24 मध्ये 7,680 कोटी रुपये लागतील.” तर या अनुदानाचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात.
सरकार देतय मोफत गॅस कनेक्शन
2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सरकार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन देते. कुटुंबातील महिलेच्या नावे गॅस कनेक्शन दिले आहे. जर तुम्ही उज्ज्वला योजनेअंतर्गत एलपीजी सिलिंडर कनेक्शन घेतले असेल तर तुम्हाला एलपीजीवर सबसिडी देण्यात येते. सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक एलपीजी (lpg gas)कनेक्शनशी लिंक करावा लागेल. तसेच तुम्हाला या सबसिडीचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधार (aadhar card)गॅस (lpg gas) कनेक्शनशी लिंक असणे आवश्यक आहे. 14.2 किलो एलपीजी सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी मिळते.
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाच मिळते सबसिडी
स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदानाचा लाभ केवळ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाच मिळणार असल्याचे केंद्र सरकारने गेल्या वर्षी स्पष्ट केले होते. इतर कोणालाही स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर सबसिडी दिली जाणार नाही. मुख्य ग्राहकांना केवळ विनाअनुदानित दराने (विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर) एलपीजी सिलिंडर (lpg cylinder)खरेदी करावे लागतील. तर उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत 9 कोटींहून अधिक मोफत एलपीजी गॅस कनेक्शनचे वाटप केले आहे.
वाचा: बाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?
तुम्ही याप्रमाणे सबसिडी तपासू शकता
स्वयंपाकाच्या गॅसवर मिळणारी सबसिडी तुम्ही ऑनलाइन पाहू शकता.
- यासाठी सर्वात आधी तुम्ही My LPG www.mylpg.in या साइटवर जा.
- वेबसाइटवर तुम्हाला तीन गॅस कंपन्यांची नावे सापडतील.
- यानंतर तुम्ही ज्या कोणत्या कंपनीकडून कनेक्शन घेतले आहे त्यावर क्लिक करा.
- यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल. येथे फीडबॅकसह पर्याय निवडा.
- यानंतर कस्टमर केअरचे एक पेज तिथे उघडेल, यात तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि एलपीजी आयडी क्रमांक भरावा लागणार आहे.
- यानंतर एलपीजीशी (lpg cylinder)संबंधित सर्व माहिती तुमच्यासमोर उपलब्ध होईल.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- सरकारी पेन्शनर्सना नो टेन्शन; हयात असल्याचा पुरावा आता द्या घरी बसून…
- चर्चा तर होणारचं ना राव! चक्क 1 कोटींच्या बंगल्यात राहते ‘ही’ गाय अन् खाते तुपातले लाडू, जाणून घ्या खासियत
Web Title: Good news for matches! A big announcement by the central government has announced a subsidy of on LPG cylinders