Shevaga Subsidy | वैरणीसाठी शेवगा लागवडीला मिळतंय अनुदान, शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी मिळणारं ‘इतके’ अनुदान
शेतकरी हा फक्त शेती (Agriculture) करत नसून, शेतीला जोडधंदा म्हणून पशूपालन Animal Husbandry) करत असतो.
Shevaga Subsidy | मात्र, पशुपालन व्यवसाय हा सहजरीत्या होत नसून हा व्यवसाय करताना बऱ्याच अडचणी निर्माण होत असतात. या अडचणींचा विचार करून केंद्र सरकार (Central Government)आणि राज्य सरकार (State Government) शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. दरम्यान, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान (National Livestock Campaign) अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी पशुपालकांना वैरणीसाठी शेवगा लागवड (Shevaga cultivation) करण्यासाठी अनुदान (Subsidy) देण्यात येणार आहे.
काय आहे योजना?
राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत पशुपालकांना वैरणीसाठी ‘शेवगा लागवड करणे’ (Cultivation of Shevaga) या योजनेकरिता अर्ज सुरु झाले आहेत. केंद्र शासनाने सन २०२१-२२ या चालू वर्षामध्ये पशुसंवर्धनासाठी राष्ट्रीय पशुधन ( वैरण विकास) अभियान योजनेस मंजुरी दिली आहे. त्यामुळे पशुपालकांना वैरणीसाठी शेवगा लागवड अनुदान मिळणार आहे.
योजनेअंतर्गत मिळणार ‘इतके’ अनुदान
राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी पशुपालन करणाऱ्या व्यक्तीस वैरणीसाठी शेवगा लागवड करण्यास प्रति हेक्टरी ३० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. १५ हेक्टर क्षेत्राकरिता ४ लाख ५० हजारांचे अनुदान वितरित करण्यात आले असून प्रतिहेक्टरी ७.५ किलो शेवगा बियाण्याची किंमत ६ हजार ७५० रुपये इतकी वितरित करण्यात येणार आहे. तसेच, उर्वरित २३ हजार २५० रुपये अनुदान लाभार्थ्यांना दोन टप्प्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे.
दरम्यान, संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्य पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद, पशुधन विकास अधिकारी पंचायत समितीमध्ये भेट घ्यावी. जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू झालेल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित योजनेची माहिती घ्यावी. तसेच, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बी आर नरवाडे यांनी केले आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: