कृषी सल्ला

सावधान: खते खरेदी करताना होऊ शकते फसवणूक! वेळीच सावधान व्हा आणि करा “या” उपाययोजना…

Caution: Fraud can occur when buying fertilizers! Be careful in time and take "these" measures

शेतकऱ्यांचे मान्सून (Monsoon) आगमन होण्यापूर्वी बि- बियाणे, कीटकनाशके (Pesticides) व खते घेण्यासाठी लगबग सुरू होते, मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाणे व खते कीटकनाशके यांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. कोरोनाच्या काळात कच्च्या मालामध्ये (raw materials) वाढ झाल्याकारणाने किंमती वाढल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. रासायनिक खताच्या (chemical fertilizers) किंमती वाढल्या कारणाने शेतकरी काळजीत पडला आहे.

मागील दोन वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी सर्व खतांच्या किमतींमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे, यामध्येच बोगस बियाणे यामुळे अतोनात शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तसेच या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट (Financial budget) कोलमडले आहे. काही वेळेला शेतकऱ्यांची खते खरेदी करताना फसवणूक होऊ शकते, त्याकरता सतर्क (Cautious) राहणे आवश्यक आहे.

खते खरेदी करण्यापूर्वी घ्या या गोष्टी लक्षात : (Remember these things before buying fertilizers)

१) खत विक्रेत्यांनी जुन्या व नव्या खताचा साठा किती आहे व त्यांच्या किती किंमती (Prices) आहेत यावर लक्ष द्या.

२) असा फलक दुकानाजवळ लावणे बंधनकारक आहे, जो व्यवसायिक विक्रेता असा फलक लावत नाही त्यावर दंडात्मक कारवाई (Punitive action) होऊ शकते.

खुशखबर ! “या” कारणामुळे येणार मान्सून दहा दिवस आधी…

३) जर जुने खताचा साठा (Stock of old manure) असेल तर जुन्या किमतीने खते विकत घ्या, त्याकरता गोणीवरची किंमत (The price on the sack) पाहण्यास विसरू नका.

४) गुणवत्तापूर्ण (Quality) तसेच योग्य भावात बी-बियाणे खते व कीटकनाशके (Pesticides) मिळण्याकरिता भरारी पथकाची नियुक्ती (Appointment of Bharari Squad) करण्यात आली आहे.

Weather Alert: 11 ते 13 मे पर्यंत या भागात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या धारा, हवामान खात्याचा इशारा…

५) जिल्हास्तरीय भरारी पथकाची कृषी विभागाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली, असून फसवणूक होत असल्यास आपल्यास योग्य न्याय (Fair justice) मिळेल.

 “कृषी विमा पॅटर्न” ठरत आहे शेतकऱ्यांना वरदान! पहा कोणत्या जिल्ह्यामधील कृषी विमा पॅटर्न राबविण्यात येणार…

हे ही वाचा:

1)“या” योजनेच्या माध्यमातून करा पेरू फळबागाची लागवड आणि मिळवा शास्वत उत्पन्न!
2) सरकारचा मोठा निर्णय! एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान एवढ्या मोठ्या रुपयाचे मंजूरी वाचा: सविस्तर बातमी…
3)लिंबूवर्गीय (संत्री)फळझाडाची अशी करा लागवड.. मिळवून देईल भरघोस उत्पन्न!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button