बँक खाते साफ होण्याच्या अगोदर लवकरात लवकर हा ' चोर '- मी E-शेतकरी
इतर

Cyber security| बँक खाते साफ होण्याच्या अगोदर लवकरात लवकर हा ‘ चोर ‘ पकडा ..

सायबर सिक्युरिटीच्या ची गरज –

देशभरात डिजिटलायझेशन ( Digitalization) होत आहे . सर्वत्र ऑनलाईन सेवा चालू झालेली आहे . आज आपल्या स्मार्टफोन ( Mobile ) वरती सर्व गोष्टी करता येतात. त्याचा जसा फायदा आहे, तसेच तोटेही आहेत. पण तुम्ही त्याचा वापर कसा करता यावर हे सर्व अवलंबून आहे.
सायबर सिक्युरिटीच्या (Cyber Security) दृष्टीने काही काळजी घेणे आवश्यक आहे. आपले बँक खाते सुद्धा आता आपल्या स्मार्टफोन वरती जोडता येते व त्यातून सर्व ट्रांजेक्शन करता येतात .काळजी घेतली नाही तर तुमचे बँक खातेही (Bank Account) साफ होऊ शकते.

वाचा: अरे वाह! केवळ 500 रुपये गुंतवून लखपती होण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या काय आहे प्लॅन…

स्मार्टफोन वापरताना सावध राहण्याची गरज –

आपण फोन वापरत असताना आपल्याला काही लिंक येत असतात .ॲप डाऊनलोड ( Application ) करताना अथवा ई-मेलवर (E-mail) आलेली एखादी लिंक डाऊनलोड करताना, त्याची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय ते डाऊनलोड करु नका. अनेक ॲप तुमचा डाटा चोरतात, तुमची खासगी माहिती, बँक तपशीलवर त्यांचा डोळा असतो. Google ने Play Store मधून अशी काही ॲप हटवली होती. कारण ते युझर्सच्या परवानगी विना त्यांचा डाटा चोरत होती. Meta (Facebook) ने दावा केला आहे. त्यानुसार, 10 लाख युझर्संनी मोबाईलमध्ये चोर लपवला आहे.

ब्रेकिंग न्युज: उद्यापासून ‘हा’ वाहतूक नियम पाळा नाहीतर, दंड द्यावा लागेल मोठा दंड..!

काय आहे दावा –

Meta (Facebook) च्या दाव्यानुसार, 10 लाख युझर्संनी स्मार्टफोनमध्ये अशे ॲप डाऊनलोड केली आहेत. जी त्यांचा डाटा चोरत आहेत. त्यांचा वैयक्तिक तपशील चोरत आहेत. त्याचा गैरवापर करत आहेत.वापरकर्त्यांचा वैयक्तिक तपशीलच नाही तर त्यांचा बँकेविषयीचा तपशीलही या अॅप्सनी चोरला आहे. त्यामुळे या युझर्सची बँकिंग माहिती चोरट्यांच्या हाती लागली आहे. त्याचा वापर ते कसा करतात हा प्रश्न आहे. Android Users वापरकर्त्यांना अशी ॲप शोधणे कठिण नाही. कारण अनेक सॉफ्टवेअर ( Software) असे आहेत, जे मेलवेअर ( Malware) शोधून ते हटवू शकतात. त्याचा वापर लगेच थांबविणेच नाही तर त्यांची तक्रार करणेही आवश्यक आहे.

वाचा: घरावर लावा ‘ही’ मशीन अन् मोफत मिळवा वीज! मोठ्या उद्योजकानही केलं कौतुक; जाणून घ्या सविस्तर…

कंपन्यांचे चिंता का वाढली –

सायबर सिक्युरिटी चे चिंता सर्वत्र कायम आहे.सध्या Joker Malware ची चर्चा सुरु आहे. या मेलवेअरने टेक कंपन्यांची चिंता वाढवली आहे. तसेच वापरकर्त्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी ‘Optimizing’ आणि ‘Cleaning’ आवश्यक आहे. त्यामुळे ॲप डाऊनलोड करताना, त्याबद्दल प्ले स्टोअरवर त्याची माहिती जाणून घ्या. नवखं ॲप डाऊनलोड करताना, त्याचे रेटिंग ही चेक करा, कोणत्याही लिंकवरुन शक्यतोवर ॲप डाऊनलोड करुच नका.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button