ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
राशिभविष्य

Lifestyle | तुमची जन्मतारीखच ठरविते करिअरची दिशा ! जाणून घ्या सविस्तर …

Lifestyle |आपल्या जन्मतारखेवर (Birth date) आणि जन्मवेळेवर अनेक गोष्टी अवलंबून असतात. म्हणून शास्त्रात जन्मतारखांना विशेष महत्त्व आहे. आज जाणून घेऊयात जन्मतारखेवरून तुमचे करिअर आणि यश ! ज्या लोकांची जन्मतारीख १,१०,१९ किंवा २८ आहे, त्या लोकांचा संबंध सूर्याशी असतो. अशा लोकांच्या शिक्षणात सहसा अडथळे येतात. तसेच शासन, प्रशासन, वैद्यक आणि राजकारण हे क्षेत्र या लोकांसाठी लाभदायक असते.

हे लोक ज्या क्षेत्रात जातात, त्या क्षेत्रात ते नेहमीच नेतृत्व करतात. आयुष्याच्या सुरुवातीपासूनच त्यांचे करिअर सुरू होते. २०२३ मध्ये या लोकांच्या करिअरमध्ये काही चढ-उतार येऊ शकतात. या लोकांनी सूर्याची उपासना केली तर त्यांना करिअर मध्ये यश मिळेल.

वाचा: ‘बँकांनी मारले सरकारने तारले’ ! शेतकऱ्यांना पीककर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई होणार ; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

०२, ११, २० किंवा २९ जन्मतारीख – या तारखेला जन्मलेल्या लोकांचा संबंध चंद्राशी असतो. हे लोक अतिशय मेहनतीने आपले शिक्षण पूर्ण करतात. कला, चित्रपट, वैद्यक, नौदल, शिक्षण आणि खाण्यापिण्याची क्षेत्रे या लोकांसाठी लाभदायी असतात. या लोकांच्या करिअरच्या सुरुवातीस उशीर होतो, परंतु कालांतराने त्यांच्या सर्व समस्या दूर होतात. २०२३ मध्ये या लोकांना करिअरमध्ये मोठे बदल करावे लागतील. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी या लोकांनी भगवान शिवाची पूजा करा.

३,१२,२१ किंवा ३० जन्मतारीख – ज्या लोकांची जन्मतारीख ३,१२,२१ किंवा ३० असते, त्या लोकांचा संबंध गुरूशी असतो. हे लोक अतिशय ज्ञानी मानले जातात, यामुळे त्यांची शिक्षण आणि बौद्धिक स्थिती चांगली असते. या लोकांना शिक्षण, धर्म, कायदा, प्रसारमाध्यमे आणि सहकार क्षेत्रात लाभ मिळतो. करिअरच्या सुरुवातीला त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. २०२३ मध्ये या लोकांच्या करिअर आणि स्थानामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी या लोकांनी श्री हरी विष्णूची पूजा करा.

४,१३,२२ किंवा ३१ जन्मतारीख – ज्या लोकांची जन्मतारीख ४,१३,२२ व ३२ आहे ते लोक राहूशी संबंधित आहेत. या लोकांच्या शिक्षणात चढ-उतार असतात. हे लोक काहीतरी वेगळा अभ्यास करतात आणि काम मात्र दुसरेच काही करतात. हे लोक संगणक, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स, ज्योतिष आणि विपणन क्षेत्रात चांगले काम करू शकतात. २०२३ मध्ये करिअरमधील मोठे निर्णय घेताना या लोकांनी सावधगिरी बाळगावी. तसेच करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी भगवान शिवाची पूजा करावी

५,१४ किंवा २३ तारीख– ज्या लोकांची जन्मतारीख ५, १४ किंवा २३ आहे, त्यांचा संबंध बुधाशी असतो. या लोकांसाठी बँकिंग, वित्त, विपणन आणि वाणिज्य क्षेत्र चांगले आहे. हे लोक सर्व प्रकारची आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू शकतात. सुरवातीच्या काळात त्यांचे करिअर काही वेगळेच राहते, मात्र नंतर ते त्यांचे करिअर बदलून चांगले स्थान मिळवतात. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी या लोकांनी गणेशाची पूजा करणे सर्वात फायदेशीर आहे.

६,१५ किंवा २४ जन्मतारीख – ६,१५ किंवा २४ जन्मतारीख असणाऱ्या लोकांचा संबंध शुक्राशी असतो. हे लोक शिक्षणाच्या बाबतीत खूप बदल करतात. या लोकांसाठी चित्रपट, माध्यम, औषध, रसायने, दागिने, सौंदर्य, शिक्षण इत्यादी क्षेत्रे चांगली आहेत. अशा लोकांना यश उशिरा आले तरी त्यांचे करिअर लवकर सुरू होते. करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी या लोकांनी लक्ष्मीजींची पूजा करणे फायदेशीर आहे.

६,१६ किंवा २५ जन्मतारीख – ज्या लोकांची जन्मतारीख ७, १६ किंवा २५ आहे, ते लोक केतूशी संबंधित आहेत. हे लोक शिक्षणाच्या बाबतीत मध्यम आहेत मात्र अतिशय हुशार आणि सर्जनशील असतात. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, सर्जनशीलता, तत्त्वज्ञान किंवा प्रवास हे क्षेत्र या लोकंसाठी चांगले राहील. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी या लोकांनी भगवान शिवाची पूजा करा.

८,१७ किंवा २६ जन्मतारीख – ज्यांची जन्मतारीख ८, १७ किंवा २६ आहे, त्यांचा संबंध थेट शनिशी असतो. या लोकंसाठी कारखाना, उद्योग, लोखंड, कोळसा, शिक्षण, कायद्याच्या क्षेत्रात वाव आहे. त्याची कारकीर्द फार लवकर सुरू होते. मात्र भरपूर अडचणी येतात. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी या लोकांनी शनिदेवाची पूजा करावी.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Webtitle: Career scope according to your birthdate

Birthdate, Career, Life, Success, Lifestyle

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button