कृषी सल्ला

सोयाबीन बियाणे लागवड करण्यापूर्वी “घ्या” अशी काळजी…

Care to "take" before planting soybean seeds

नांदेड: सोयाबीनचे पिक हे स्वपरागसंचित (Self-pollinated) आहे. त्यामुळे दरवर्षी सोयाबीनचे बियाणे मध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही. प्रमाणित बियाणे(Certified seeds) वापरल्यानंतर त्याचे उत्पादन देणारे बियाणे पुढील दोन वर्षांपर्यंत वापरता येते अशी माहिती कृषी अधिकारी रवीकुमार सुखदेव यांनी शेतकऱ्यांना दिली आहे.

बियाणे निवड प्रक्रिया:
यंदा मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे दर वाढल्यामुळे बियाण्यांचे दरही त्याचा परिणाम होणार आहे त्यामुळे कृषी विभागाकडून(From the Department of Agriculture) शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आले आहे , स्वतःचे बियाणे वापरल्यामुळे उत्पादन खर्च कमी होईल. तसेच ग्राम बीजोत्पादन पीक प्रात्यक्षिक योजनेअंतर्गत (Under Village Seed Production Crop Demonstration Scheme) आलेल्या उत्पादनातून बियाण्याची निवड करता येईल.

हे ही वाचा: सोयाबीनच्या “या” आहेत नवीन जाती! काय आहे विशेष गुणधर्म पहा

बियाण्यांची हाताळणी:
सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असते तसेच त्याचे बाह्य आवरण पातळ असते त्यामुळे उगवण क्षमता अबाधित राखण्यासाठी बियाण्यांची व्यवस्थित (Arrange the seeds) हाताळणी करणे गरजेचे आहे.

बियाण्यांची साठवणूक:
हे बियाणे साठवणूक करण्याकरिता 10 ते 12 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आर्द्रता(High humidity)नसावी तसेच साठवणूक करण्याकरिता प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करू नये. बियाणे साठवण करताना सात फुटापेक्षा अधिक जास्त थप्पी होणार नाही याकडे लक्ष द्यावे. सोयाबीनची उगवण क्षमता 70 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्यास बियाणे वापरू नये.

पेरणी प्रक्रिया:
75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर सोयाबीनची पेरणी करावी, तसेच पेरणी करताना तीन ते चार सेंटीमीटर खोलीपर्यंत आत मध्ये करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम थायरम बुरशीनाशक(Fungicide) बीजप्रक्रिया करावी, तसेच जिवाणूसंवर्धकाची (Bactericidal) प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे नंतर पेरणी करावी असे आवाहनही रवीकुमार सुखदेव यांनी केले आहे.

हेही वाचा:
पीक व्यवस्थापनामध्ये ठिबक सिंचनाचे महत्व पहा सविस्तर पणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button