इतर

Crime |अर्रर्र..! तरुणीला आयटम म्हणणं तरुणाला चांगलचं पडलं महागात; पुढं काय झालं ते तुम्हीचं वाचा…

Crime | महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत एका व्यक्तीला न्यायालयाने (Mumbai) लैंगिक शोषणाच्या प्रकरणात (POCSO) दीड वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

एका तरुणाने अल्पवयीन मुलीला ‘आयटम’ बोलवून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपखाली त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावर न्यायालयाने म्हटले आहे की, जेव्हा एखाद्या मुलीला उद्देशून ‘आयटम’ हा शब्द वापरला जातो, हे त्या मुलीचे लैंगिक शोषण मानले जाईल.

वाचा: बिग ब्रेकिंग! आता आधार कार्डद्वारे घेता येणार रेशन कार्डावरील धान्य; वाचा UIDAI चा मोठा निर्णय

एक महिन्यापासून करत होता मुलीचा पाठलाग

तर टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबईतील POCSO कोर्टाने 26 वर्षीय व्यावसायिकाला 16 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. तसेच 2015 मध्ये या आरोपीने शाळेतून परतणाऱ्या मुलीचे केस ओढत म्हटले ‘क्या ‘आयटम’ कहाँ जा रही है?’ यावर न्यायालयाने सांगितले की, आरोपी एक महिन्यापासून लैंगिक हेतूने मुलीचा पाठलाग करत होता

रोडसाइड रोमिओंना धडा शिकवणे आवश्यक आहे

यावर आरोपीच्या चांगल्या वागणुकीमुळे माफीची याचिका ही फेटाळून लावताना विशेष न्यायाधीश एसजे अन्सारी म्हणाले की, महिलांना अन्यायकारक वागणुकीपासून वाचवण्यासाठी अशा गुन्ह्यांवर कठोरपणे कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वात आधी अशा रोडसाइड रोमिओंना धडा शिकवणे आवश्यक आहे. मुलीच्या पालकांना तरुणाने त्यांच्या मुलीसोबत केलेली मैत्री ही आवडत नसल्यामुळे त्यांना देखील या प्रकरणी अडकविण्यात आले होते. तसेच या अल्पवयीन मुलीला जुलै महिन्यातच न्यायालयात हजर करण्यात आले होते.

वाचा: बाप रे! पालघरमध्ये होतोय चक्क भुताचा व्हिडिओ व्हायरल; विश्वास बसत नसेल तर पहा व्हिडिओ

तर यावर एकमेव साक्षीदार असलेल्या अल्पवयीन मुलीने सांगितले की…

तसेच या प्रकरणातील एकमेव साक्षीदार असलेल्या या अल्पवयीन मुलीने सांगितले की, ती 14 जुलै 2015 रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास शाळेत जात होती. तर हा आरोपी देखील त्याच्या गल्लीत बसला होता. तो त्याच्या मित्रांसोबत होता. यावर मुलीने पुढे सांगितले की, जेव्हा ती दुपारी 2.15 च्या सुमारास शाळेतून परतली. त्यानंतरही आरोपी हा रस्त्यात दुचाकीवर बसला होता आणि तिला पाहताच तो तिच्या मागे आला, असे अल्पवयीन मुलीने सांगितले. तसेच त्या तरुणाने तिचे केस ओढले आणि तिला आयटम बोलला.

मुलीने लगेच केला 100 नंबर डायल

तसेच त्या मुलीने सांगितले की, जेव्हा त्याने माझ्यासोबत असे केले तेव्हा मी त्याला धक्काबुक्की केली आणि असे करू नकोस असे सांगितले. मग यानंतर आरोपीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि मला हवे ते करेन असे त्याने सांगितले. त्यावेळी अल्पवयीन मुलीने लगेच 100 नंबर डायल केला. परंतु पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी हे पळून गेले होते. यानंतर मुलीने वडिलांना घटनेची माहिती दिली.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : A good thing happened to the young man! Calling the young woman ‘item’ is expensive; Know the detailed information

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button