ससेपालन करून कमी जागेमध्ये मिळवू शकता अधिक उत्पादन; पहा ससेपालन व्यवसाय सविस्तर..
ससेपालन (Rabbit farming) शेतकऱ्यांना (farmers) अधिक फायदेशीर ठरू शकते. शेतीसोबत शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकरी (farmers) ससेपालनाचा (Rabbit farming) व्यवसाय करू शकता. यातून मिळणारा फायदाही चांगला मिळू शकतो. आपण ससेपालन कसे करावे? व्यवस्थापन कसे करावे? याविषयी सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
ससेपालन –
ससेपालन (Rabbit farming) पिंजऱ्यात चांगले होऊ शकते. महत्वाच म्हणजे पिंजऱ्यात स्वच्छता राहते. ससे पाळताना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी लाकडाचा भुसा टाका कारण त्यांना उकरण्याची सवय असते. भुसे टाकले की ससे (Rabbit) तिथेच उकरत बसतील. म्हणजे बाहेर जाण्याची किंवा पळुन जाण्याची शक्यता कमी असते.
वाचा –
ससाला लागणारा आहार –
सशाचा (Rabbit) आहार धान्य, गोळ्या किंवा पावडरच्या स्वरूपात असतो. हिरव्या चाऱ्यामध्ये सशांना ओट्स, बेरसीम, राई गवत इत्यादी खायला दिले जाऊ शकते. यांच्या पिल्लांना देखील धान्य बारीक करून खायला द्या. बुरशी लागलेले धान्य शक्यतो टाळा. कारण बुरशी धान्यात रोग असतात वेगवेगळे किटाणू असतात. यामुळे सस्याला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच ससेपालन (Rabbit farming) करणाऱ्याला सुद्धा आर्थिक नुकसान होऊ शकते.
ससा पालणासाठी काही प्रमुख जाती
सोव्हिएत चिंचिला, व्हाईट जायंट, ब्लॅक ब्राउन, न्यूझीलंड व्हाईट, ग्रे जायंट, अंगोरा, डच इ. प्रमुख जाती आहेत. ससेपालनासाठी उत्तम ठरतील.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा