योजना
ट्रेंडिंग

कुसुम सोलर योजनेच्या घटक “अ” ची बंपर ऑफर, वाचा नोंदणी कशी कराल..

Bumper offer of Kusum Solar Scheme component "A", read how to register ..

कुसुम सोलर योजनेच्या घटक अ करिता नोंदणी सुरु झालेल्या आहेत. ज्या शेतकर्यांची स्वताची जमीन या सोलर प्रोजेक्टला (solar project) भाड्याने देण्यासाठी अर्ज काढण्यात आले होते. ज्या शेतकर्यांना १० एकर जमीन याठिकाणी या शासनाला या उद्योजकांना निवेशकांना भाड्याने देण्यासाठी (rent) हे अर्ज सुरु झाले होते याच प्रक्रिया सुरु करण्यात आलेल्या आहेत . यांच्यासाठी काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियाची नोटीस १८ ऑगस्ट २०२१ पासून सुरु झालेल्या आहेत. याची प्रीपेड मिटिंग ३१ ऑगस्ट २०२१ ला असणार आहे. टेक्निकल आणि फायनन्शियल बीड सबमिशनची शेवटची दिनांक १७ सप्टेंबर २०२१ असणार आहे.

शेतकर्यांना दिवसा ८ तास विजेचा पुरवठा व्हावा शेतकर्यांना दिवसा सिंचन (irrigation) करणे शक्य व्हाव यासाठी देशामध्ये कुसुम सोलर पंप (kusum solar pump) योजना राबविण्यात येते . याच योजनेच्या अंतर्गत पार्ट अ अर्थात घटक अ च्या अंतर्गत नवीन नोंदणी अर्ज प्रक्रिया सुरु झालेल्या आहेत.

घटक अ –
घटक अ च्या अंतर्गत शेतकर्यांना, निवेशकांना, संस्थाना याठिकाणी ०.५ पासून २ मेगावेट पर्यंतचे जे काही सोलर प्रोजेक्ट आहेत ते प्रकल्प याठिकाणी उभा करता येतात.

पार्ट ब
पार्ट ब च जर पाहिलं तर याच्या अंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने प्रमाणेच शेतकर्यांना ३ एचपी, ५ एचपी व ७.५ एचपी चे पंप जनरल कॅटेगरीसाठी ९० टक्के तर sc,st कॅटेगरीसाठी ९५ टक्के अनुदानावर दिले जातात.

पार्ट c च्या मध्ये –
ज्या शेतकर्यांकडे सध्या विजेचा पुरवठा आहे अशा शेतकर्यांना नेट ग्रीड, ओन ग्रीड च्या माध्यमातून याठिकाणी दिले जातात. ज्याच्यासाठी ४० टक्के अनुदान शासनाच्या माध्यमातून दिलं जातं. याच योजनेच्या अंतर्गत पार्ट अ ची नोंदणी निवेदन प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.

रजिस्ट्रेशन कसं करायचं नोंदणी कोणत्या वेबसाईटवर केली जाणार आहे. याच्या निविदा प्रक्रिया कशा प्रकारे भरल्या जाणार आहेत आपण पाहूया…

वाचा : स्वस्त कर्जात व्यवसाय उभा करायचा आहे? तर तुम्हाला या योजनेबद्दल माहीत असलेच पाहिजे..

वाचा : या’ सरकारी योजनेद्वारे तुम्ही कमवू शकता लाखो रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती…

अर्ज कसा करायचा?

1. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या वेबसाईट ओपन करायची. अर्ज नोंदणी वर क्लिक करा, नोंदणी केली असेल तर username व password टाकून लॉग इन करा आणि नसेल केली तर न्यु नोंदणी वर क्लिक करून नोंदणी करू शकता. उद्योजक किवा विकासक नोंदणीसाठी न्यु वर क्लिक करा. लॉग इन आयडी क्रिएट करा username व password क्रिएट करा.

2. developer म्हणून अर्ज भरा.अर्जदाराचे पूर्ण नाव, अर्जदाराचा पत्ता, मोबाईल नंबर, आधारकार्ड, मेल आयडी ही सगळी माहिती भरा.पुढची सगळी माहिती तुमच्यापर्यंत मेल वरती येईल. आणि शेवटी सबमिट करा. तुमचा अर्ज successful म्हणून msg येईल.

3. शेवटी पुन्हा पहिल्या पेज वरती जावून लॉग इन करून इ-टेंडर वर क्लीक केल्यावर डॅशबोर्ड दिसेल. Devloper वर क्लीक करा. डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये लिंक येईल त्यावर जावून इ-टेंडर (e-tender) साठी अर्ज करायचा आहे जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही. पुढच्या दोन तीन स्टेप करून माहिती भरा व सबमिट करा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button