ताज्या बातम्या

बुलेटीन सुपरफास्ट: आज ‘या’ जिल्हामध्ये पाऊस पडण्याची शक्यता! पहा राज्यातील इतर घडामोडी एका क्लिकवर…

Bulletin Superfast: Chance of rain in 'Ya' district today! See other developments in the state at a click

नगर जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादकांना (Onion growers in Nagar district) मोठ्या संकटांना सामना करावा लागत आहे. एकीकडे वरुणराजाने हजेरी लावली आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद आहेत. शेतकऱ्यांना फार मोठा प्रश्न पडलेला ( question for the farmers) आहे की शेतातील कांद्याचे काय करायचं? शेतात पडून असलेला कांदा खराब होण्याच्या मार्गावर आहे. याचाच फायदा घेऊन अनेक व्यापारी बांधावर कांदा घ्यायला येत आहेत.

1.गाव- वाड्या-वस्त्यामधील जनतेला पाणीसाठा उपलब्ध करून देण्यासाठी ‘स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना‘ राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला आहे.

2. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लादण्यात आलेले निर्बंध चार टप्प्यांत उठवले जाण्याची शक्यता आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात दुकाने सुरु करण्यात येतील. त्यानंतरच्या टप्प्यात हॉटेल आणि बार सुरु करण्यास परवानगी मिळेल. धार्मिक स्थळे शेवटच्या टप्प्यात उघडली जातील.

[metaslider id=4085 cssclass=””]

3.संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं 26 मे रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी शेतकरी आंदोलनाला देशातील तब्बल 12 मोठ्या विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. दिल्लीमध्ये सीमेवर सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण होत असल्याच्या कारणानं या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

4.मान्सूनपूर्वी सर्व मुलांना इन्फ्लूएन्झा लस देण्यात यावी, असा सल्ला महाराष्ट्राच्या कोविड टास्कफोर्स आणि नव्याने स्थापन केलेल्या पीडियाट्रिक टास्कफोर्सने राज्य सरकारला दिला आहे. रविवारी (23 मे) दोन्ही टास्कफोर्समधील डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे आवाहन केलं. इन्फ्लूएन्झाची लस दिल्यास या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल,

5.बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचं 25 मे रोजी चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता, असून 26 मे रोजी ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टीवर हे चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्यानं यासंदर्भातील ही माहिती दिली.

6. तर आज महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याच हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितल आहे.

7.राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जवळपास 38 हजार हेक्टर इतकी विक्रमी फळबाग लागवड झाली आहे. ही समाधानाची बाब असताना त्या तुलनेत जिल्ह्यातील आकडेवारी समाधानकारक नसल्याने मंत्री श्री. भुसे यांनी शेततळे व फळबाग लागवडीचे उद्दीष्ट विहीत कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

8.लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा, कोविडविरुद्धची आपली एकजुटीची साखळी मजबूत ठेवून या विषाणूला पराभूत करू,असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा :

1)खरीप पीक कर्ज वाटप सुरू! पहा कसे असतील पिकानुसार कर्जाचे दर?

2) अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी शेतीविषयक बातमी, हवामान अंदाज, कृषी सल्ला, आणि भरपूर ज्ञानाचा खजाना मिळवण्यासाठी या डिजिटल मॅक्झिन ला विजीट करा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button