ताज्या बातम्या

Budget 2024 | राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठ्या घोषणा! शेतकऱ्यांनो लगेच वाचा सरकारचे टॉप 10 निर्णय

Budget 2024 | Big announcements in the interim budget session of the state! Farmers, read the top 10 decisions of the government immediately

Budget 2024 | मंगळवारी (२७ फेब्रुवारी २०२४) राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी अशा सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय आणि विकासाची संधी देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 • अर्थसंकल्पीय अधिवेशनातील टॉप 10 निर्णय:
 • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भुसंपदान पूर्ण: भारतातील पहिली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भुसंपदान पूर्ण झालं आहे.
 • वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू पालघरपर्यंत: 7 हजार 500 किमीची रस्त्याची कामे हातात घेण्यात येणार आहेत. वर्सोवा वांद्रे सागरी सेतू पालघरपर्यंत केला जाणार आहे.
 • पेन्शनधारकांना दिलासा: संजय गांधी निराधार योजनेत 1000 वरुन 1500 रुपये पेन्शन दिली जाणार आहे.
 • रेडीओ क्लब जेटीसाठी 227 कोटी: रेडीओ क्लब जेटीसाठी 227 कोटी रुपयांच्या काम सुरु होणार आहे.
 • दवोसमध्ये 19 कंपन्यांसोबत करार: जानेवारी 2024 मध्ये दवोस येथे 19 कंपन्यांसोबत करार झाले आहेत.
 • पाच इंडस्ट्रियल पार्क, ‘मेक इन इंडिया’साठी 196 कोटींच्या निविदा: निर्यात वाढीसाठी 5 इंडस्ट्रियल पार्क तयार करण्यात येत आहेत.

वाचा | PM Kisan Yojana | काऊंटडाऊन सुरू! पीएम किसान आणि नमो शेतकरीचे दोन्ही हप्ते येणार शेतकऱ्यांच्या खात्यात; जाणून घ्या कधी?

 • आठ लाख 50 हजार नवीन कृषीपंप बसवणार: शेतकऱ्यांसाठी सौर आणि कृषीपंप योजना राबवण्यात येणार, 8 लाख 50 हजार नवीन कृषीपंप बसवण्यात येणार आहेत.
 • एक लाख महिलांना रोजगार, 5000 पिंक रिक्षा: 40 टक्के अपारंपारिक उर्जा राबविणार आहे. 37 हजार आंगणवाडींना सौर उर्जा दिली जाणार आहे. एक लाख महिलांना रोजगार दिला जाईल.
 • मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना: मुलींना 18 वर्षांपर्यंत विविध टप्प्यांमध्ये एक लाख एक हजार रुपये निधी देण्यात येईल.
 • खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भरीव तरतूद: ‘मिशन लक्षवेध’ योजनेअंतर्गत राज्य स्तरावर उच्च कामगिरी केंद्र, विभागीय स्तरावर क्रिडा उत्कृष्टता केंद्र, जिल्हा स्तरावर क्रिडा प्रतिभा विकास केंद्र अशी खेळाडंसाठी त्रिस्तरीय प्रशिक्षण यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

Web Title | Budget 2024 | Big announcements in the interim budget session of the state! Farmers, read the top 10 decisions of the government immediately

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button