
Budget | पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक (Financial) उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा सरकार करू शकते. केंद्र सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पाचवा अर्थसंकल्प (Budget) सादर करणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या (Agriculture) उत्पन्नाबाबत मोठी घोषणा अपेक्षित आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी खास ठरू शकतो.
वाचा: आनंदाची बातमी! पुढील महिन्यात कापसाचे दर वाढणार; जाणून घ्या चालू महिन्यात कसा राहील बाजारभाव?
पंतप्रधान किसान योजनेची वाढणारं रक्कम
महागाईचे नवे विक्रम असताना या अर्थसंकल्पाकडून जनतेला (Agriculture Division) मोठ्या आशा आहेत. केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधीशी (PM Kisan Yojana) संबंधित मोठी घोषणा करू शकते, असे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर तुम्हाला एक चांगली बातमी मिळू शकते. म्हणजे तुमचे आर्थिक (Finance) उत्पन्न दुप्पट होऊ शकते.
बिग ब्रेकिंग! शेतकऱ्यांना तब्बल 50 लाख रुपये देण्याचा राज्य सरकारचा निर्णय; जाणून घ्या सविस्तर
सरकार करू शकते मोठी घोषणा
आगामी अर्थसंकल्प 2023 मध्ये, केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधीमध्ये वार्षिक 6,000 रुपयांच्या वाढीची घोषणा करू शकते. प्रत्यक्षात या योजनेंतर्गत अनेक वेळा रक्कम वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी 2022 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातही किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्याची मागणी जोरात सुरू होती.
वाचा:अर्रर्र..! पुढचे चार दिवस राज्यात पावसाचं वातावरण; त्वरित जाणून घ्या हवामान आधारित कृषी सल्ला
मात्र, यंदा या अर्थसंकल्पात या योजनेच्या रकमेत वाढ होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. याशिवाय येत्या आर्थिक वर्षापासून ही रक्कम 6 हजारांवरून 8 हजार रुपयांपर्यंत वाढवून शेतकऱ्यांना वर्षभरात 2 हजार रुपयांचे 4 हप्ते देता येतील, अशीही चर्चा आहे. जर हा निर्णय घेण्यात आला तर शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक दिलासा मिळणारं आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- खर्च आणि फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आता शेतकऱ्यांना मिळणार घरबसल्या कीटकनाशक
- ब्रेकिंग न्यूज! ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; एकरकमी एफआरपी देण्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय
Web Title: Farmers’ income will double! Know the increase amount of Central Government Pradhan Mantri Kisan Yojana