दिनंदीन बातम्या
BSNL Next| बीएसएनएल विरुद्ध जिओ: डेटा आणि वैधतेच्या बाबतीत बीएसएनएल पुढे|
BSNL Next| मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने 45 कोटींहून अधिक ग्राहकांसाठी दर वाढवल्यानंतर, सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल आकर्षक (Attractive) पर्याय बनला आहे.
बीएसएनएलने कोणत्याही प्लानमध्ये दर वाढवले नाहीत, तर जओने आपल्या बहुतेक प्लानमध्ये 22% पर्यंत दरवाढ केली आहे. यामुळे अनेक ग्राहक बीएसएनएलकडे वळत आहेत.
आज आपण बीएसएनएल 997 आणि जिओ 999 या दोन्ही लोकप्रिय (Popular) प्लॅन्सची तुलना करणार आहोत आणि डेटा आणि वैधतेच्या बाबतीत कोणता प्लॅन अधिक फायदेशीर आहे हे पाहूया.
वाचा:Training| मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना: बेरोजगारी कमी करण्याचा प्रभावी उपाय|
प्लॅनचे मूल्य आणि वैधता:
- बीएसएनएल 997: कमत (Price) ₹997, वैधता 160 दिवस
- जिओ 999: किंमत ₹999, वैधता 98 दिवस
डेटा:
- बीएसएनएल 997: दररोज 2GB डटा, एकूण 320GB डेटा
- जिओ 999: दररोज 2GB डेटा, एकूण 196GB डेटा
इतर फायदे:
- दोन्ही प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS समाविष्ट (included) आहेत.
- बीएसएनएल 997 मध्ये काही ॲप्सचा विनामल्य प्रवेश मिळतो.
- जिओ 999 मध्ये जिओच्या तीन ॲप्सचा समावेश आहे.