दिनंदीन बातम्या

BSNL| बीएसएनएलची 4G सेवा: जियो, एअरटेल आणि वोडाफोनच्या वाढीव दरांमुळे ग्राहकांमध्ये वाढती मागणी|

BSNL| नवी दिल्ली: जियो, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया सारख्या खाजग कंपन्यांनी त्यांच्या टॅरिफमध्ये वाढ केल्याने, भारतीय दूरसंचार कंपनी लिमिटेड (BSNL) ला चांगली संधी मिळाली आहे. देशभरात BSNL सिमसाठी मोठी मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर, केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी BSNL च्या स्वदेशी 4G तंत्रज्ञानाचे कौतुक कले आहे.

तथापि, BSNL 4G सेवा कधी सुरू होईल याच तारीख त्यांनी निश्चित केली नाही. MTNL मध्ये “लवकरच” 4G आणि 5G सेवा सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

बीएसएनएलचे लक्ष स्वदेशीवर

केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी सांगितले की, “तेजस नेटवर्क, BSNL, TCS आणि CDOT सारख्या भारतीय कंपन्या एकत्रितपणे काम करत आहेत. भारताने केवळ सेवा पुरवठा करणारा देश बनू नये, तर उत्पादनांचा पुरवठादार बनणे आवश्यक आहे.”

ते पुढे म्हणाले, “मी तुम्हाला खात्री देतो, आम्ही या प्रयत्नांसाठी 1 लाख RAN (Radio Access Netv) तैनात करण्याच्या दिशेने काम करत आहोत.” भारतात तंत्रज्ञान विकसित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या तंत्रज्ञानाचा वापर केवळ देशभरातच नाही तर निर्यातीसाठीही केला जाईल.

वाचा: Minerals| व्हिटामीन बी-१२ ची कमतरता: लक्षणे आणि निवारण|

भारत 6G मध्ये अग्रेसर होईल

5G मध्ये झपाट्याने वाढ झाल्यानंतर, भारत आता 6G तंत्रज्ञानाच्या वकासामध्ये अग्रेसर (leading) होण्यासाठी काम करत आहे, असे सिंधिया यांनी सांगितले. भारत 5G साठी ॲप्स आणि सोल्यूशन्सच्या विकासावरही काम करत आहे.

सायबर सुरक्षा हा महत्त्वाचा विषय

सायबर सुरक्षेबाबत बोलताना ते म्हणाले, “भारत डिजटल आघाडीवर प्रगती (progress) करत असताना, सायबर सुरक्षा आघाडीवर मोठा धोका निर्माण झाला आहे. आजकाल युद्धे केवळ जमिनीवरच लढली जात नाहीत तर अनेक आभासी मार्गांनीही लढली जातात. सायबर सुरक्षा हा देश, नागरिक आणि व्यवसायांचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाचा आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button