ताज्या बातम्या

ब्रेकिंग न्यूज : केंद्रीय मंत्रीपदाची शपथविधी पार! महाराष्ट्राच्या वाटेला चार मंत्रिपदे, पहा यामध्ये कोणाकोणाचा आहे समावेश..

Breaking News: Union Minister sworn in! Four ministerial posts on the way to Maharashtra, see who is involved in this ..

सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ (The first cabinet) विस्तार पार पडला आहे. आज महाराष्ट्रातील नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज 43 मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यात 11 महिलांचा समावेश आहे. नव्या विस्तारात उत्तर प्रदेशाच्या (Of Uttar Pradesh) वाट्याला सर्वाधिक सात मंत्रिपदे गेली आहेत. तर महाराष्ट्राच्या (Of Maharashtra) वाट्याला चार मंत्रिपदं (Four ministerial posts) आली आहेत. त्यात नारायण राणे (Narayan Rane) यांना कॅबिनेट मंत्रिपद (Cabinet ministership) देण्यात आलं आहे.

हे ही वाचा : टेक्निकल गुरु: बाजारात आला आहे, “होंडाचा पावर टिलर” वाचा; उपयोग आणि वैशिष्ट्य…

सरकार स्थापन होऊन जवळपास दोन वर्ष उलटल्यानंतर आता मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) होतोय. या विस्ताराआधी सरकारमधील 12 मंत्र्यांनी राजीनामे दिले. महाराष्ट्रातून राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी कॅबिनेट तर भिवंडीचे खासदार कपिल पाटील दिंडोरीच्या खासदार भारती पवार आणि राज्यसभा खासदार भागवत कराड यांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली.

15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये पहिला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे.

हे ही वाचा : गाईच्या शेणापासून तयार होणार रंग! या प्रकल्पासाठी नितीन गडकरी असणार ब्रँडॲम्बेसिडर वाचा सविस्तर बातमी…

यामध्ये एकूण 43 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामधील 15 मंत्र्यांना कॅबिनेट तर 28 मंत्र्यांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2024 ची लोकसभा निवडणूक पाहता हा मंत्रिमंडळ विस्तार महत्वाचा मानला जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. तर कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद (Minister of State) मिळालं आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा :

1. इंधन दरवाढीबाबत, “नितीन गडकरी” यांचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना “या” निर्णयाचा किती फायदा होणार जाणून घ्या ; सविस्तर बातमी…

2. ‘ही’ आधुनिक अवजारे वापरा आणि पिक उत्पादन खर्च कमी करा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button