कृषी बातम्या

ब्रेकिंग न्यूज : केंद्र सरकार स्थापन करणार 10 हजार शेतकरी उत्पादक संस्था – केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर

BREAKING NEWS: Union government to set up 10,000 farmer producer organizations - Union Agriculture Minister Narendra Singh Tomar

केंद्र सरकार (Central Government) शेतकरी उत्पादक संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्वाचे पाऊल टाकणार आहे त्याकरिता दहा हजार शेतकरी उत्पादन संस्था (Farmers Production Institution) स्थापन करण्याची केंद्र सरकारचे नियोजन आहे याकरता सुमारे 6 हजार 865 कोटी रुपयांचा निधी खर्च करणार आहे.

शेतकरी उत्पादक संस्थेमुळे ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (‘One District One Product’) या योजनेला गती मिळणार आहे परिणामी संपूर्ण जिल्ह्याचा विकास होणार आहे. लोकसभेमधील विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना कृषी मंत्री नरेंद्र सिंग (Agriculture Minister Narendra Singh) यांनी माहिती दिली.

देशातील प्रत्येक तालुक्यासाठी एक उत्पादक संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे आतापर्यंत 632 संस्थांची नोंदणी झाली असून 4465 शेतकरी उत्पादक संस्थांचे वाटप अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेला करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे स्थानिक शेतीमाल क्लस्टरचा (Of the agricultural cluster) निश्चितच विकास होईल.

वाचा: PM Kisan Samman Nidhi Yojana: ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार 2000 हजार रुपये..

वाचा: तरुण संशोधकांची शेतकऱ्यांसाठी धडपड, शेतीचे नुकसान टाळण्यासाठी उभारलं किफायशीर हवामान केंद्र..

एका अहवालानुसार शेतकरी उत्पादक संस्थेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात 21 टक्के वाढ झाली आहे, त्याचप्रमाणे कोणतेही पर्यायपेक्षा उत्पादक कंपन्यांनी मार्केटिंग केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात 31 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च (Production costs) 1385 रुपये कमी झाला आहे. 2020 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 1950 कृषी उत्पादक संस्था आहे, याबाबत देशात महाराष्ट्रात (In Maharashtra) सर्वाधिक शेतकरी उत्पादक संस्था आहेत, त्याखालोखाल आंध्रप्रदेश, गुजरात, हरियाणा कर्नाटक तामिळनाडू, तेलंगणा या राज्यांचा समावेश होतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button