कृषी सल्ला

Information | काय सांगता? चक्क काळ्या तांदळाचं होतंय उत्पादन; जाणून घ्या काय आहे वैशिष्ट्य अन् नफा

काळ्या तांदळाची शेती –

तांदूळ ( Rice ) आपल्या भोजनातला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आहे. यासाठी संपूर्ण जगभरात मागणी असते.सध्या सगळेच शेतकरी पांढर्‍या रंगाचे तांदूळ पिकवतात.पारंपरिक ( Traditional Farming) पद्धतीची भातशेती ( Agriculture) अत्यल्प उत्पादनामुळे तोट्याची ठरत असताना त्यावर उपाय म्हणून राज्यात एक वेगळा प्रयोग सांगली (Sangli) जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी महागडा आणि आरोग्यवर्धक असणाऱ्या काळ्या तांदळाचं (Black Rice) उत्पादन घेतलं( Agricultural Information) आहे.

काळ्या तांदळाचे वैशिष्ट्ये –

तांदूळ खाण्यास पौष्टिक आणि आरोग्यवर्धक आहे. सांगली जिल्ह्यात महागडा आणि आरोग्यवर्धक असणाऱ्या काळ्या तांदळाचे उत्पादन घेण्यात आलं आहे. आसाममधून बियाणे मागवून शिराळा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी या काळ्या तांदळाचे उत्पादन घेण्याचा प्रथमच प्रयोग केला आहे. ब्लॅक राईस चे 200 ते 250 रुपये किलो असे महागडे बियाणे आहे. शिराळा तालुक्यातील पोषक वातावरणात हा भाताचा प्रयोग यशस्वी ठरत असून यातून चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे. हा तांदूळ खाण्यास पौष्टिक आणि आरोग्यवर्धक आहे. हा तांदूळ शिजण्यास वेळ लागतो, पण पौष्टिक असतो. या तांदळाची किंमतही जास्त आहे. उत्पादक शेतकऱ्यांना हा तांदूळ चांगला नफा मिळवून( Agricultural Information) देतो.

वाचा: घरावर लावा ‘ही’ मशीन अन् मोफत मिळवा वीज! मोठ्या उद्योजकानही केलं कौतुक; जाणून घ्या सविस्तर…

सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर –

भाताची शेती जास्त करत असल्यामुळे शिराळा तालुक्यात हे नफा मिळवून देत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात पारंपरिक भात बियाणांपेक्षा नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशाने कृषी अधिकाऱ्यांच्या साहाय्याने काही शेतकऱ्यांनी आसाममधून ब्लॅक राईस आणला होता. 200 ते 250 रुपये किलो असलेले महागडे बियाणे मागवले होते. पेरणीतून उगवलेल्या रोपातून त्यांनी बाजूच्या दुसऱ्या क्षेत्रात जुलै महिन्यात रोपांची लागण केली होती. पेरणी केलेल्या पिकापेक्षा लागणीचे पीक अधिक चांगले आहे. सध्या हे भात परिपक्व होत आलेले आहे. या भाताची लांबी आणि आतील तांदूळ काळ्या रंगाचा( Agricultural Information)आहे. या पिकासाठी त्यांनी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर केला आहे.

वाचा: अरे वाह! केवळ 500 रुपये गुंतवून लखपती होण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या काय आहे प्लॅन…

आरोग्यवर्धक देशी भातांच्या वाणांचे संवर्धन करणे हा उद्देश –

काळ्या तांदळाचे पिक घेण्याचा उद्देश हा आहे की आरोग्यवर्धक देशी भातांच्या वाणांचे संवर्धन करणे. तसेच त्याच्या लागवडीखालील क्षेत्र वाढवायचे. त्याचबरोबर या वाणांना बाजारपेठेत असणारी जास्तीची मागणी आणि जास्तीचा दर हे लक्षात घेऊन या तांदळाचे उत्पादन वाढवायचे हा उद्देश असल्याची माहिती कृषी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी( Agricultural Information) दिली. या तांदळाचे उत्पन्न हे हेक्टरी 25 ते 30 टन आहे. पण याला मिळणारा बाजारभाव हा 60 रुपये ते 200 रुपयापर्यंत मिळत असल्याची माहिती क्षीरसागर यांनी दिली.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button