टोमॅटोच्या पिकांपासून उद्योगातील मोठी संधी! पहा याकरता कोणती उपकरणे लागतात…
Big opportunity in the industry from tomato crops! See what equipment is needed for this
टोमॅटोला (Tomatoes) मागणी वर्षभर राहते, परंतु टोमॅटो हे नाशवंत पीक (Perishable crop) असल्याकारणाने, काढणीनंतर लगेच मार्केट मध्ये विक्री करताना आणावा लागते, नाहीतर लगेच खराब होऊन नुकसान होऊ शकते, टोमॅटो वर प्रक्रिया (Processed on tomatoes)करून पदार्थ मार्केटमध्ये (In the market) विकता ही येतात.
टोमॅटो वर विविध प्रक्रिया करण्याकरिता तंत्रज्ञानाची गरज असते त्यासाठी विविध उपकरणे लागत असतात.
वर्षभर टोमॅटोला मागणी असूनही, कधी चांगला भाव मिळतो तर कधी मार्केट मध्ये आवक जास्त असल्यास त्याला उत्तम दर मिळत नाही. टोमॅटो नाशवंत पदार्थ असल्याकारणाने त्याची दीर्घकाळ साठवून (Long-term storage) देखील करता येत नाही अशावेळी टोमॅटोवर प्रक्रिया करून वेगवेगळे पदार्थ करून मार्केटमध्ये विकल्यास फायदेशीर ठरते उदाहरणार्थ टोमॅटो सूप, टोमॅटो सोस
टोमॅटोपासून अनेक पदार्थ बनवले जातात जसे की भूकटी, सॉस, सूप, रस, केचअप, (Tomato soup, tomato sauce) सॉस असे पदार्थ तयार केले जातात. हे पदार्थ बनवत असताना लोखंडी भांड्यांचा उपयोग करू नये (Iron utensils should not be used) यामुळे पदार्थ खराब काळसर पडण्याची भीती असते.
हे ही वाचा : सावधान: खते खरेदी करताना होऊ शकते फसवणूक! वेळीच सावधान व्हा आणि करा “या” उपाययोजना…
या प्रक्रियांसाठी आवश्यक उपकरणे
1)स्टीम जॅकेट केटल:(Steam jacket kettle)
या उपकरणाचा उपयोग सॉस तयार करणे तसेच सूप तयार करण्यासाठी याचा वापर उपयुक्त ठरतो किंवा मिश्रण करण्यासाठी देखील याचा उपयोग करता येतो. या किटली ला दोन थर असून आतील थरामुळे पदार्थ शिजला जातो बाहेरील थरांमधून पाण्याची वाफ सोडली जाते. हे उपकरण स्वयंचलित असून विद्युत प्रणालीवर किंवा गॅस वर देखील चालते.
2) फळे धुण्याकरता वापरात येणारी यंत्र:(A machine used for washing fruits)
यंत्राच्या साह्याने एका तासामध्ये दोनशे किलो फळे स्वच्छ धुतली जातात, व फळांवरील धूळ किंवा अन्य घटक साफ केले जातात. हे यंत्र स्टेनलेस स्टील पासून बनलेले असून, हे यंत्र सिंगल फेज वर चालले जाते.
हे ही वाचा : या” योजनेच्या माध्यमातून करा पेरू फळबागाची लागवड आणि मिळवा शास्वत उत्पन्न!
3) स्टॅंडर्ड ट्रे ड्रायर:(Standard Tray Dryer:)
हे यंत्र अल्युमिनियम पासून बनवले असून, अर्धस्वयंचलित आहे, हे यंत्र देखील सिंगल फेज वर चालत असून याचे तापमान 150 अंश सेल्सिअस इतके असते.
4)पल्वलायझर:(Pulverizer)
या यंत्राचा उपयोग टोमॅटोपासून भुकटी तयार करण्यासाठी होतो, हे यंत्र स्टेनलेस स्टील व अल्युमिनीयम पासून बनवण्यात आले आहे. हे यंत्र स्वयंचलित असून या यंत्राच्या मदतीने एका वेळेस 22 किलो पर्यंत प्रक्रिया होऊ शकते.
हे ही वाचा :
1)या’ यंत्र च्या साह्याने माती परीक्षण करणे झाले स्वस्त आणि सोपं; पहा काय आहे या यंत्र चे वैशिष्ट्ये?
2)नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती करण्याकरता ‘या’ योजनेतून मिळवा अनुदान, असा करा, “ऑनलाईन” अर्ज…