योजना

मोठी बातमी: पीएम किसान योजनेच्या 10 व्या हप्त्यासाठी हे कार्ड अनिवार्य; अन्यथा होणार नाहीत खात्यात पैसे जमा ..

Big News: This card is mandatory for 10th installment of PM Kisan Yojana; Otherwise it will not be credited to the account.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi) योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने (central government) रजिस्ट्रेशन प्रक्रियेत काही बदल केले गेले आहेत. याअंतर्गत आता पीएम किसान योजनेत रजिस्ट्रेशनसाठी (registration) रेशन कार्ड (ration card) अनिवार्य करण्यात आले आहे. रेशनकार्डशिवाय तुम्ही या योजनेत रजिस्ट्रेशन करू शकत नाही.

वाचा –

डॉक्युमेंट्स असे सबमिट करा –

रेशन कार्डच्या (ration card) अनिवार्य गरजेसोबतच, आता रजिस्ट्रेशनच्या वेळी केवळ डॉक्युमेंट्सच्या सॉफ्ट कॉपी (PDF) बनवाव्या लागतील आणि पोर्टलवर अपलोड कराव्या लागतील. सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि डिक्लेरेशनच्या हार्ड कॉपी जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता या डॉक्युमेंट्सची PDF फाईल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे.

‘या’ दिवशी खात्यात पैसे येतील –

सरकारने PM KISAN योजनेअंतर्गत 10 वा हप्ता जारी करण्याची तारीख निश्चित केली आहे. केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता जारी करण्याचा विचार करत आहे.

वाचा –

रजिस्ट्रेशन असे करा –

1) तुमच्या फोनमधील Google play store वरून PMKISAN GOI Mobile App डाउनलोड करा.

2) आता ते उघडा आणि New Farmer Registration वर क्लिक करा.

3) आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर Continue वर क्लिक करा.

4) रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये नाव, पत्ता, बँक खाते डिटेल्स, IFSC कोड एंटर करा.

5) नाव, पत्ता, बँक डिटेल्स, IFSC कोडसह रजिस्ट्रेशन फॉर्म भरा.

6) सबमिट वर क्लिक करा. PMKISAN GOI Mobile App वर रजिस्ट्रेशन पूर्ण केले जाईल.

7) चौकशीसाठी, हेल्पलाइन नंबर 155261 / 011-24300606 वापरा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button