मोठी बातमी, एसटी तिकीट दरात आजपासून वाढ; काय आहेत तिकीट ? पहा सविस्तर..
एसटी महामंडळाने प्रवास दरात 17.17 टक्क्यांची भाडेवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ही माहिती दिलेली आहे. किती भाडेवाढ केले? याविषयी सविस्तर माहिती घेऊया..
भाडेवाढ (26 ऑक्टोबर) लागू –
कोरोना काळात एसटी महामंडळाला बसलेला मोठा फटका आणि डिझेलचे (diesel) वाढलेले दर यामुळे तिकीट दरवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळाला (ST Corporation) अधिकचे 50 कोटी रुपये गोळा होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य (State of Maharashtra) एसटी महामंडळाचे (ST Corporation) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले की, कोरोना काळात मंडळाला बसलेला आर्थिक फटका आणि डिझेल दरवाढीमुळे एसटीचे प्रवासी भाडे 17.7 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. ही नवीन दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
वाचा –
महामंडळाने तब्बल तीन वर्षानंतर दरवाढ केली –
एसटी महामंडळाने (ST Corporation) दिलेल्या माहितीनुसार साधी जलद व रात्री सेवेसाठी (service) प्रति टप्पा 9.7 रुपयांची वाढ करण्यात आली असून निम आराम व शयन आसनी सेवेसाठी प्रति टप्पा 12.85 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शिवशाही सेवेसाठी प्रति टप्पा 13. 35 रुपये तर शिवनेरी सेवेसाठी 19.50 रुपये प्रति टप्पा दर आकारण्यात येणार आहे. रातरानी सेवेच्या संदर्भात देखील महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून अतिरिक्त दर रद्द करण्यात आले आहेत. दिवसा व रात्री धावणाऱ्या बसेसचे तिकिट (ticket) दर सारखेच ठेवण्याचा निर्णय (decision)घेण्यात आला आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा