पशुसंवर्धन

मोठी बातमी; “या” ठिकाणी जनावरांची केली जाते सोनोग्राफी, शेतकऱ्यांना होतोय फायदा..

शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा शेळी मेंढी पालन हा व्यवसाय ठरलेला आहे. शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी मोठमोठे शेळी मेंढी फार्म (Goat sheep farm) उभे केले आहेत. पण योग्य नियोजणाचा अभाव असल्याने प्राण्यांचा भाकड काळ वाढतो. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात लहान जनावरांचे सोनोग्राफी मशीन (Animal sonography machine) एकमेव येथील तालुका सर्व चिकित्सालय पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत आहे. याचा शेतकऱ्यांना अधिक फायदा होत आहे. वेळ खर्च वाचवून उत्पन्नामध्ये वाढ होत आहे. याविषयी सविस्तर माहिती घेऊया..

वाचा –

शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी मोठमोठे शेळी मेंढी फार्म (Goat sheep farm) उभे केले आहेत. परंतु योग्य नियोजणाचा अभाव असल्याने प्राण्यांचा भाकड काळ वाढतो. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या शेतकरी आतभट्यात आल्याने काही शेळी मेंढी फार्म मोडकळीस आलेले आहेत. शेतकऱ्यांनी खचून न जाता अशा नवनवीन तंत्रज्ञाचा (latest technology) फायदा घेतला पाहिजे. पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला मार्गदर्शन घेतले पाहिजे. येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पर जिल्ह्यातून शेळी, मेंढी पालक शेतकऱ्यांचा ओढा वाढलेला दिसून येत आहे. शेतकऱ्यांचे पाऊल उत्पन्नाच्या दिशेने दिसत आहे.

वाचा –

या सुविधा उपलब्ध –

सर्व चिकित्सालय पशुवैद्यकीय दवाखाण्यात कुत्रा, मांजर – २५ दिवसांनी, शेळी, मेढी -३० दिवसांनी , घोडा – २ महिन्यांनी , गाय, म्हैस -३५ दिवसांनी सोनोग्राफी (sonography) केली जाते. एक्सरे मशीन, शस्त्रक्रिया या सुविधा सुरु आहे. पशुपालक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. इस्लामपूरातील डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली १५ दिवसाच्या कालावधीत या शेळ्या भरवल्या होत्या. इस्लामपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात त्यांची सोनोग्राफी केली. अशी माहिती दिली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button