ताज्या बातम्या

मोठी बातमी; लवकरच रेशन दुकानावर होणार छोटे गॅस सिलेंडर उपलब्ध, पहा सरकारचा निर्णय..

सर्वसामान्य लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांसाठी (farmers).ही एक दिलासादायक बातमी आहे. एलपीजी गॅस सिलिंडर (LPG gas cylinder) आता सहजपणे उपलब्ध होणार आहे. सरकार यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे. केंद्र सरकारने (Central Government) म्हटले आहे की आता रेशन दुकानांमध्ये छोटे एलपीजी गॅस सिलिंडरची (LPG gas cylinder) विक्री करण्यास परवानगी देण्याचा विचार केला जात आहे. याविषयी सविस्तर माहिती घेऊया…

वाचा –

तसेच दुकानांद्वारे इतर वित्तीय सेवादेखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. समोर आलेल्या वृत्तानुसार या मुद्द्यांवर आणि प्रस्तावांवर राज्य सरकारांबरोबर केंद्र सरकारची (Central Government) एक व्हर्च्युअल बैठक झाली. त्यात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

सोबत पेट्रोलियम कंपन्यांचा प्रस्तावाला पाठिंबा

पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारच्या (Central Government) छोट्या एलपीजी गॅस सिलिंडरला रेशन दुकानांवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकार (Central Government) आणि राज्य सरकारांना (state governments) यासाठीचा पाठिंबा दिला जाईल, असे सांगितले आहे. या बैठकीतसंदर्भात सांगण्यात आले की खाद्य सचिवांनी एफपीएसच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असण्यासाठी ठोस पावले उचलण्यावर भर दिला.

वाचा –

राज्य सरकारांनी (state governments) म्हटले की कॉमन सर्व्हिस सेंटरबरोबर सहकार्य करून एफपीएसचे महत्त्व वाढेल. त्यांनी या गोष्टीचाही उल्लेख केला की स्थानिक गरजा लक्षात घेऊन त्याचा आढावा घेण्यासाठी सीएससीबरोबर ताळमेळ साधला जाईल. एफपीएसद्वारे वित्तीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर वित्तीय सेवांच्या विभागाच्या प्रतिनिधींकडून सांगितले आहे की, रस असणाऱ्या राज्य सरकारांना आवश्यक ती मदत केली जाईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button