ताज्या बातम्या

मोठी बातमी; या योजनेसाठी नोंदणी अर्ज सुरु, या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान, लवकर घ्या लाभ..

फळपिकांच्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शेतकरी (Farmers) शेती (Agriculture) सोबत फळपिकांची लागवड सुद्धा चांगली करू शकतात. फळपिकांचाही विमा उतरविण्यावर शेतकऱ्यांचा (Farmers) भर आहे. यातच राज्यात आंबिया बहरासाठी फळपिक विमा योजन तील नोंदणी अर्जाला सुरवात झाली आहे. अवेळी पाऊस तापमानातीव बदल, अतिवृष्टी किंवा गारपीटीमुळे नुकसान झाल्यासही अनुदान हे मिळणार आहे.

वाचा –

या 9 फळपिकांचा समावेश –

डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी ही पिके असतील. यावर्षी वातावरणातील बदल आणि अधिकचा झालेला पाऊस यामुळे अनेक फळबागायत हे विमा योजनेचा लाभ घेतील असे चित्र आहे. अधिसूचित क्षेत्र व अधिसूचित फळांची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या तालुका कृषी अधिकारी (Agriculture Officer) कार्यालयास भेट द्यावी. एक शेतकरी (Farmers) एकापेक्षा जास्त फळबागांसाठीदेखील या योजनेत भाग घेऊ शकतात. मात्र त्या फळासाठी संबंधित मंडळ अधिसूचित आहे की नाही याची खात्री शेतकऱ्यांना (Farmers) करावी लागेल. एक शेतकरी चार हेक्टरच्या मर्यादेपर्यंत विमा संरक्षण मिळवू शकतो. विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्क्यांच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता ठेवण्यात आलेला असतो.

आंबिया बहर म्हणजे नेमके काय?

आंबिया बहर हे नोव्हेंबर-डिसेंबर किंवा डिसेंबर जानेवारी मध्ये घेतले जाणारे फळपिकं आहेत. ज्यावेळी आंब्याला बहर येतो त्या दरम्यान हे फळपिक बहरात असते. यामध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्राबेरी यांचा समावेश होत आहे.

वाचा –

आवश्यक कागदपत्रे –

कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी देखील ही योजना ऐच्छिक असेल. बिगर कर्जदारांना सहभाग घ्यायचा असल्यास आधार ओळखपत्र, सातबारा, आठ अ उतारा, पीक लागवडीचे स्वयंघोषणापत्र, फळबागेचा टॅगिंग चिन्हांकित केलेले छायाचित्र, ब‌ँकेचे खातेपुस्तक अशी माहिती गोळा करावी. ऑनलाइन अर्ज (Apply online) भरण्याची सुविधा गावातील सीएससी सेंटरवर उपलब्ध आहे.

या संकेतस्थळावर सहभागी व्हा –

शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या साईट्स चा उपयोग होणार आहे. केंद्र सरकारने hhhps://pmfby.gov.in या साईट्स चा वापर करण्याचे अवाहन केले आहे तर राज्य सरकारने http://www.maharashtra.gov.in या साईटवर पिक विमा कंपन्या जिल्हे, विमा प्रतिनीधी यांची नावे दिलेली आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button