मोठी बातमी, अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत जाहीर; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार..
अतिवृष्टी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकर्यांना दिलासा बातमी आहे. 13 ऑक्टोबर रोजी मंत्री मंडळात झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या माध्यमातून १० हजार कोटी रुपयाची मदत जाहीर केलेली आहे. यामध्ये जिरायती क्षेत्रासाठी प्रती हेक्टर १० हजार रुपये मदत दिली जाणार आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया.
वाचा –
ऐका शेतकऱ्याला 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मदत –
बागायती खेत्रासाठी प्रती हेक्टर १५ हजार रुपये तसेच फळबाग, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार प्रती हेक्टर मदत जाहीर करण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त एका शेतकर्याला २ प्रती हेक्टर मदत जाहीर करण्यात आलेली आहे. एका शेतकर्याला २ हेक्टरच्या मर्यादेमध्ये दिली जाणार आहे. म्हणजेच ५ एकरच्या क्षेत्र मर्यादेपर्यंत शेतकर्यांना नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे.
वाचा –
पूर्ण महाराष्ट्रासाठी १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर –
पूर्ण महाराष्ट्रासाठी १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. रस्त्याचे, शेतीचे नुकसान अशा सर्व प्रकारांसाठी हि मदत असणार आहे यामधून साधारणपणे शेतकर्याच्या नुकसानीसाठी ५ हजार पाचशे ते ६ हजार कोटी रुपये एवढी मदत मिळणे अपेक्षित आहे. मंत्री मंडळाच्या घोषणेनुसार प्रत्येक जिल्ह्याचा डाटा कलेक्ट करून प्रत्येक जिल्ह्याला रक्कम ठरवली जाणार आहे, तसेच कोणते लाभार्थी आहेत या सर्व प्रोसेससाठी साधारण २५ ऑक्टोंबर चा कालावधी लागू शकतो.
जाहीर केलेली मदत ही दिवाळीच्या अगोदर किंवा दिवाळी नंतर शेतकर्यांच्या खात्यात क्रेडीट होऊ शकते. असा अंदाज आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा