योजना

मोठी बातमी, आता शेतकऱ्यांना सुद्धा डीलरशिप; सीएनजी पंपासाठी अर्ज सुरू, घ्या सरकारी अनुदानाचा लाभ..

नवीन व्यवसायासाठी सीएनजी पंप उभारणी सर्वात चांगला उपाय आहे. केंद्र सरकारने सीएनजी गॅस स्टेशन उभारणीसाठी प्रोत्साहन योजना हाती घेतली आहे. ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून सीएनजी पंपाची उभारणी करून आर्थिक उत्पन्नाचा नवा स्त्रोत प्राप्त करून देण्यात येत आहे. याविषयी सविस्तर माहिती घेऊया..

वाचा –

राजधानी दिल्ली सोबतच प्रमुख राज्यांत सीएनजी पंप एजन्सी नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. राजधानी दिल्लीत सर्वाधिक सीएनजी पंपाची संख्या आहे. अन्य राज्यात सीएनजीच्या ऑनलाईन डीलरशीप प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.

सीएनजी पंप उभारणी साठी आवश्यक पात्रता व अटी खालीलप्रमाणे आहेत-

अर्जदार व्यक्ती भारताचा नागरिक असावा
अर्जदाराचे किमान दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असावे
अर्जदाराचे वय 21 ते 55 दरम्यान असावे.
या सर्व अटींसोबत अर्जदाराकडे सीएनजी पंप उघडण्यासाठी स्वमालकीची जमीन असण्याची आवश्यकता आहे.

वाचा

सीएनजी पंपासाठी किती जमीन असावी?

सीएनजी पंप सुरू करण्यासाठी अर्जदाराकडे जमीन असणे ही मुलभूत अट आहे. स्वमालकीची जमीन नसल्यास अन्य जमीन मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र असणे अत्यंत महत्वाचे आहे. तुम्ही तुमच्या परिवाराच्या सदस्याच्या जमीनीसाठी देखील सीएनजी पंपाकरिता अर्ज करू शकतात. मात्र, तुम्हाला ना-हरकत प्रमाणपत्र आणि प्रतिज्ञापत्र सादर करणे अत्यंत महत्नाचे असेल. भाडेतत्वावर घेतलेल्या जमीनीसाठी मात्र करारनामा असणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे शेज जमीन असल्यास तुम्हाला बिगर-शेतकी (एनए) करणे अत्यंत गरजेचे आहे. जमीनी संबंधित सर्व कागदपत्रे व नकाशा सोबत असायला हवा.

सीएनजी पंपासाठी एकूण खर्च किती?

सीएनजी पंप डीलरशीप/एजन्सी सुरू करण्यासाठी ठिकाण व कंपनींवर अवलंबून आहे. किमान 30 ते 50 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी अर्जदाराकडे
15,000 ते 16,000 स्क्वे. फूट जागा असणे आवश्यक आहे.

सीएनजी डीलरशिप किंवा एजन्सीचे लाभ:

आयकरात 5 वर्षांची सूट
सरकारी अनुदान
राष्ट्रीयकृत बँकाकडून कर्ज

सीएनजी पंप डीलरशीप प्रदान करणाऱ्या कंपन्या –

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड
हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन
महानगर गॅस लिमिटेड
गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया
महानगर नॅचरल गॅस लिमिटेड
इंडो-ब्राइट पेट्रोलियम प्रायव्हेट लिमिटेड
गुजरात स्टेट पेट्रोलियम प्रायव्हेट लिमिटेड
तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर एक आठवड्याच्या आत तुम्हाला रिप्लाय प्राप्त होईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button