कृषी सल्ला

मोठी बातमी; पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये केले बदल, हे बदल माहीत करून घ्या अन्यथा निधीचा लाभ मिळणार नाही..

शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रति वर्षी सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून देण्यात येतात. या केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या योजनेमध्ये आता काही बदल करण्यात आले आहेत. ते बदल आपण सविस्तरपणे पाहुया..

वाचा –

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक

या योजनेच्या पोर्टलवर रेशन कार्ड क्रमांक दाखल केल्या नंतरच शेतकरी पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकाला पीएम शेतकरी सन्मान योजना निधीचा लाभ मिळणार आहे. आता रेशन कार्डच्या आवश्यकते सोबतच इतर कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी पोर्टल वर अपलोड करता येईल. पीएम किसान योजनेचे नवीन प्रणाली अंतर्गतरेशन कार्ड क्रमांका शिवाय नोंदणी करणे शक्य होणार नाही
तसेच आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणा पत्रा ची हार्ड कॉपी जमा करण्याची आता आवश्यकता नाही आता आपण पोर्टलवर कागदपत्रांची पीडीएफ फाईल तयार करून अपलोड करावे लागेल. तसेच या नवीन प्रणालीमध्ये योजना अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

वाचा –

अशी नोंदणी करा –

gov.in या संकेतस्थळावर लॉग इन करा. त्यानंतर त्या ठिकाणी दिसणाऱ्या फार्मरकॉर्नर या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची यावेत यासाठी नोंदणी करू शकतात. या ठिकाणी न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक,कॅपटचा कोड टाकून तुमच्या राज्य निवडा. त्यानंतर प्रोसेस पुढे जाईल. तसेच तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील,शेतीविषयक तपशील विचारला जाईल ही माहिती भरल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू करा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button