कृषी तंत्रज्ञान
ट्रेंडिंग

मोठी बातमी: महिंद्राचा नवीन “रोटावेटर” लॉन्च, आता शेतीची मशागत करता येणार अधिक सोप्प्या पद्धतीत..

Big news, Mahindra launches new "rotavator"; Now farming can be done in a simpler way.

शेतीसाठी अत्यंत उपयोगी पडणारे रोटावेटर महिंद्रा कंपनीने लॉन्च केले आहे. जगातील सर्वात मोठ्या ट्रॅक्टर उत्पादक असलेल्या महिंद्रा कंपनीने एक नवीन हेवी ड्यूटी रोटावेटर (New heavy duty rotavator) महिंद्रा महावेटर लाँच केले आहे. शेतीच्या मशागतीसाठी लागणारे अत्यंत उपयुक्त यंत्र लक्षात घेऊन महिंद्रा कंपनीने एक नवीन रोटावेटर (rotavator) लाँच केला आहे. शेतीसंबंधीत उपयोगी पडणारे नवनवीन फ्युचर चे ट्रॅक्टर्स महिंद्रा कंपनी आणायचा प्रयत्न करत असते. यावेळी शेतकऱ्यांना जमिनीची मशागत सोप्प्या पद्धतीने करता यावी. तसेच जमिनीची मशागत चांगली व्हावी हा विचार करून रोटावेटर (rotavator) लॉन्च केले आहे. आपण याविषयी सविस्तर माहिती घेऊया..

रोटवेटर चे फायदे-

सहा भारतीय महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि तामिळनाडू राज्यांसाठी सादर करण्यात आला. कडक माती, ऊस आणि कापूस या क्षेत्रांसाठी नवीन रोटवेटर चा सर्व मातीमध्ये वापर करता येईल. मातीमध्ये रोटावेटर (rotavator) फिरवल्याने जमीन भुसभुशीत होते. तसेच सुपीक झालेल्या जमिनीमध्ये लवकर पिके कापणीला येतात. जमीन भुसभुशीत केल्यामुळे येणारे तनाचे प्रमाण कमी होईल. यामुळे शेतकऱ्यांची अधिक सोप्प्या पद्धतीने पिकांची लागवड होईल. कडक पिकांच्या अवशेषांना देखील हे बारीक करेल. हे झाडांच्या वाढीसाठी मातीचे ढीग कार्यक्षमतेने बारीक करू शकते.

वाचा : पॉवर ट्रीलर अनुदान साठी अर्ज करायचा आहे, तर वाचा सविस्तर व घ्या योजनेचा लाभ..

हवामान अलर्ट: “या” जिल्ह्यात 5-6 दिवसापासून सतत पावसाचा अंदाज; काही पिकांना फायदा तर काही पिकांचे नुकसान..

500 हून अधिक महिंद्रा ट्रॅक्टर डीलर्सच्या नेटवर्कद्वारे विक्री केली जाण्याची शक्यता –

सहा राज्यांमधील 500 हून अधिक महिंद्रा महावेटरची विक्री डीलर्सच्या नेटवर्कद्वारे केली जाण्याची शक्यता आहे. महिंद्राच्या रोटाव्हेटर्सची (Of Mahindra’s rotavators) योग्यता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी तसेच तपासण्यासाठी देशभरातील भारत ते युरोप पर्यंत विविध क्षेत्रीय परिस्थितींमध्ये चाचणी केली जाते.

वाचा : सोलर पंप, विहिर व बोरवेल वर १०० टक्के वितरित निधी, “या” लाभार्थ्यांना घेता येणार लाभ..

वाचा : शेतकऱ्यनो सावधान: RBI ने FD नियमांमध्ये केले मोठे बदल; पैसे वेळेत काढा, अन्यथा आर्थिक नुकसान शक्यता..

महिंद्रा बोरोब्लेड्स ब्रँडेड हाय ड्युरॅबिलिटी रोटाव्हेटर ब्लेड देखील लॉन्च –

महिंद्राने महिंद्रा बोरोब्लेड्स ब्रँडेड हाय ड्युरॅबिलिटी रोटाव्हेटर ब्लेड (Boroblades branded high durability rotavator blades) देखील लॉन्च केले आहेत. ज्या शेतकऱ्यांना एका वेळी ट्रॅक्टर आणि रोटाव्हेटर दोन्ही खरेदी करण्यासाठी इच्छुक असतील त्यांच्यासाठी महिंद्राने महिंद्रा फायनान्सशी (Mahindra with Mahindra Finance) हात मिळवणी केली. जेणेकरून ग्राहकांना एकाच रोटाव्हेटरवर 85,000 रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणारी कर्ज योजना (Loan scheme) आणता येईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button