ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

मोठी बातमी; 8 दिवसात पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, काय निर्णय झाला? पहा सविस्तर..

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मागील वर्षसन २०२० च्या पीक विम्याची रक्कम येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांच्या (farmers) खात्यात जमा केली जाणार आहे. ही माहिती पिक विमा कंपनीने (Crop insurance company) 5 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या बैठकीत कृषिमंत्री व लोकप्रतिनिधी (Minister of Agriculture and People’s Representative) यांच्या उपस्थितीमध्ये दिलेली आहे. या विषयी सविस्तर माहिती पाहुया..

वाचा –

याआधी एक सप्टेंबर रोजी कृषी मंत्र्यांसोबत (Minister of Agriculture) बैठक झाली होती. त्यावेळी तोडगा निघाला नव्हता. जोपर्यंत राज्यशासन त्यांच्याकडे असलेली पीक विम्याची थकीत रक्कम जमा करीत नाही. तोपर्यंत पिक विमा कंपनी (Crop insurance company) शेतकऱ्यांना सन २०२० चा पिक विमा वितरीत करणार नाही असे पीक विमा कंपनीने सांगितले होते.

वाचा –

पीक विमा कंपनीने 15 दिवसांची मुदतवाढ मागितली होती

१५ सप्टेंबर पर्यंत पिक विमा कंपनीने (Crop insurance company) शेतकऱ्यांच्या खात्यात सन २०२० ची पीक विम्याची रक्कम जमा केली नाही तर १६ सप्टेंबरपासून पिक विमा कंपनीच्या (Crop insurance company) कार्यालयात आमदार डॉ.संजय कुटे यांनी आंदोलन केले. दरम्यान १६ सप्टेंबरला आ.डॉ.संजय कुटे यांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन केले असता कृषी विभागाच्या (Department of Agriculture) अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांची मुदत वाढवून मागितली होती.

वाचा –

यानुसार दि.५ ऑक्टोबर २०२१ रोजी कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव व जिल्ह्यातील आमदार यांच्या उपस्थितीत पिक विमा प्रतिनिधींची बैठक झाली. यामध्ये पिक विमा कंपनीने (Crop insurance company) आपली नकार कायमच ठेवल्याने पुन्हा पेच निर्माण झाला होता त्यानंतर परिणामी पिक विमा कंपनीच्या (Crop insurance company) प्रतिनिधींनी वरिष्ठांशी चर्चा करून येत्या आठ दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल हे मान्य केले. त्यामुळे सात-आठ महिन्यांपासून प्रलंबित असणारा हा प्रश्न अखेर मिटला. व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button