जून ते ऑक्टोंबर २०२१ पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थिमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकर्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
शासन निर्णय –
1) जून ते ऑक्टोंबर २०२१ पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्ह्यात उद्भवलेल्या पुर परिस्थितीमुळे शेतीपिकाचे नुकसान झालेल्या बाधित शेतकर्यांना खालीलप्रमाणे मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
2) जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी – कोरडवाहू क्षेत्रातील जी पिके आहेत यासाठी १० हजार प्रती हेक्टर यामध्ये प्रत्येक शेतकर्याला २ हेक्टर मर्यादेपर्यंत मदत दिली जाणार आहे.
3) बागायत पिकासाठी यामध्ये उस असेल इतर बागायत क्षेत्र असेल अशा बागायत क्षेत्रातील १५ हजार रुपये प्रती हेक्टर २ हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिली जाणार आहे.
4) तसेच ज्या शेतकर्यांच्या फळबागा आहेत वार्षिक पिकांची काही नुकसान असेल यासाठी २५ हजार रुपये प्रती हेक्टर २ हेक्टरच्या मर्यादेनंतर हि नुकसान भरपाई मदत दिली जाणार आहे.
5) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निकषा व्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शविण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या त्या लेख शिर्षाखाली खर्च करण्यात यावी.
वाचा –
6) वरील मदतीच्या व निकषा व्यतिरिक्त इतर बाबींच्या नुकसानीसाठी संदर्भाधीन क्र. १ येथील शासन निर्णयामध्ये विहित करण्यात आलेले राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व मदतिचे दर लागू राहतील.
7) पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. त्यानंतर यासाठी निधी वितरीत केल्यानंतर रक्कम आहरीत करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करावी. सदर निधी अनावश्यकरित्या आहरीत करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये. लाभार्थ्यांची मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील केंद्र शासनाच्या ndmis.mha.gov.in या संकेतस्थळावरील प्रणालीमध्ये भरण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी यांनी करावी.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२११०२११८०९३२०२१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने संक्षांकित करून करण्यात येत आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा