मोठी बातमी; ग्रेव्हीटी सेपरेटर, बीबीएफ यंत्र, भाजीपाला किट, इ. अनुदान जाहीर, “हे” असतील लाभार्थी..
नितीआयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या अंतर्गत बीबीएफ यंत्र स्पायरल ग्रेव्हीटी सेपरेटर तसेच भाजीपाला किट इ. बाबींचा लाभ देण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत या बाबींसाठी किती अनुदान दिले जाणार आहे. कोण लाभार्थी पात्र असणार आहेत? अर्ज कसा भरायचा? तसेच अटी व शर्ती काय असणार आहे? या विषयी सर्व माहिती आपण पाहुया..
वाचा –
नितीआयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्याला प्राप्त झालेल्या बक्षीस रकमेमधून मंजूर आरखड्यानुसार बीबीएफ यंत्र, स्पायरल ग्रेव्हीटी सेपरेटर तसेच स्थानिक भाजीपाला किट आहे. यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत याची शेवटची १४ ओकटोमबर २०२१ आहे.
स्पायरल ग्रेव्हीटी सेपरेटर –
यामध्ये महिला बचत गट शेतकरी गट वैयक्तिक शेतकरी यांना प्राधान्य दिले जाणार आहे. आणि यासाठी ठरलेल्या लक्षांका पेक्षा जर जास्त अर्ज प्राप्त झाले तर याबाबिचा लकी ड्रॉ पद्धतीने अवलंब करून लाभयार्थ्याची निवड करण्यात येणार आहे. वैयक्तिक लाभार्थ्यांमध्ये सिमांत शेतकरी (1 हेक्टर आतील), लहान शेतकरी (1 ते 2 हेक्टर) व इतर (2 हेक्टर पेक्षा जास्त) अशा शेतकरींना प्राधान्य क्रम दिल जाणार आहे. याबरोबर अनुसूचित जाती व महिला शेतकरी यांना देखील या योजनेच्या अंतर्गत प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी शासनाच्या माध्यमातून ९० टक्के अनुदान दिले जाणार आहे. रक्कम जास्तीत जास्त प्रती घटक १० हजार इतकी असणार आहे.
वाचा –
बीबीएफ यंत्र –
यासाठी विहित नमुन्यातील अर्ज लाभयार्थ्यानी कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे. वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, उत्पादक कंपनी याचा लाभ दिला जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, महिला शेतकरी यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी आपण जर पाहिल तर सदर घटकाला ६० टक्के अनुदान दिले जाणार आहे. जास्तीत जास्त प्रती घटक ३५ हजार असणार आहे.
स्थानिक भाजीपाला किट –
महिला बचत गट, वैयक्तिक शेतकरी यांना प्राधान्य दिले जाणार आहे. प्रतेक घटकाला १०० टक्के घटक अशा प्रकारानुसार हे अनुदान दिले जाणार आहे. यासाठी पाहिल तर विहित नमुन्यासाठी अर्ज तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करायच्या आहेत. घटक 100 टक्के अनुदानावर रक्कम रु.1000 च्या प्रति घटक मर्यादेत असणार.
अधिक माहितीसाठी –
अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद फोन – 02472-227118 सपंर्क करा. तसेच अर्जाचा नमुना जाणून घ्या व संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेशी संपर्क करा.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा