शासन निर्णय

मोठी बातमी; मागील वर्षाच्या पीकविम्याला शासनाची मंजुरी, “या” जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा..

शेतकऱ्यांचे नुकसान झाले असतानाही विमा कंपन्यांनी (insurance companies) नुकसान झाल्यानंतर पीक विमा दिला नव्हता. यानुसार बीड जिल्ह्यामधील (Beed district) राबविण्यात येणारा पॅटर्नचा लाभ आता शेतकऱ्यांना होणार आहे. यानुसार प्रशासनाकडून शासनास पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला अखेर राज्य शासनाने हिरवा कंदील दिला आहे. या निर्णयाचा फायदा बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना होणार आहे. या अनुषंगाने 936 कोटींचा (936 crores) पिक विमा (Crop insurance) देण्याचा राज्य सरकारने (State Government) निर्णय घेतला आहे. जवळपास 10 हजारांचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. याविषयी सविस्तर माहीती घेऊया..

वाचा –

625 कोटी रुपये विमा रक्कम शिल्लक –

राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा (State Government and Central Government) हिस्सा म्हणून विमा कंपनीला (insurance companies) 798 कोटी रुपये मिळाले होते. मागच्या वर्षी विमा कंपनीने केवळ 13 कोटी 50 लाख एवढीच रक्कम नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना दिली होती. यामध्ये विचार केला तर जवळजवळ सातशे पंच्याण्णव कोटी रक्कम शिल्लक आहे. विमा कंपनीशी करार केल्याप्रमाणे आता या रकमेतील 20 टक्के म्हणजे 160 कोटीची रक्कम विमा कंपनीला खर्चापोटी दिली असली तरी 625 कोटी रुपये शिल्लक राहणार आहेत. उरलेली रक्कम नफा असून तो प्रशासनाकडे येणार आहे आता ही उरलेली रक्कम शासनाने (government) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वापरण्यात यावी असा प्रस्ताव मांडलेला आहे.

वाचा –

😱 फक्त 25 रुपयांच्या ऐका रोपासून सुरुवात केली; आज “या” शेतीतून घेतोय लाखोंमध्ये उत्पन्न..

वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळणार-

बीड जिल्ह्यातील (Beed district) चार लाख शेतकऱ्यांच्या खरिपात पिकांचे नुकसान झाले होते. पंचनामे केल्यानंतरही पिक विमा कंपनीने (Crop insurance company) 72 तासाचा कालावधी उलटून गेल्याचे सांगत नुकसान भरपाई देण्यात टाळाटाळ केली होती. फक्त काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला गेला. राहिलेल्या शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार आहे. बरेच शेतकरी विमा रक्कमेच्या प्रतीक्षेत आहेत.

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button