ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या
ट्रेंडिंग

मोठी बातमी: LPG कनेक्शन सोबत मिळणार मोफत स्टोव्ह; या योजनेचा लाभ कसा घ्याल?

Big news: Free stove with LPG connection; How to avail this scheme?

कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांना 2021 च्या अर्थसंकल्पात ( In the budget) केंद्रीय अर्थमंत्री ( Union Finance Minister) निर्मला सीतारामन यांनी एलपीजी कनेक्शन योजना उज्ज्वला अंतर्गत आणखी एक कोटी ग्राहकांना कनेक्ट करण्याची घोषणा केलेली आहे. उज्ज्वला 2.0 योजनेअंतर्गत, सरकार पहिल्यांदा ग्राहकांना डिपॉझिट-फ्री (Deposit free) एलपीजी कनेक्शन, प्रथम मोफत रिफिल आणि एक हॉटप्लेट मोफत प्रदान करत आहे.

ज्यातून त्यांनी सांगितलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 ऑगस्ट रोजी सुरू केलेल्या उज्ज्वला 2.0 योजनेसाठी एका आठवड्यात 60 लाखांहून अधिक अर्ज करण्यात आले आहेत. या दुसऱ्या टप्प्यात भरपूर ग्राहकांचा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे.

लॉकडाउन (Lockdown) च्या कालावधीत अनेक गरीब, मध्यमवर्गीय ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता आला. या योजनेच लोकांना फायदा व्हावा यासाठी ही योजना काढली होती. अजूनही भरपूर ग्राहकांचा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे 2022 पर्यंत 1 कोटी कनेक्शन गाठू शकेल असे सांगितले आहे.

वाचा : स्वस्त कर्जात व्यवसाय उभा करायचा आहे? तर तुम्हाला या योजनेबद्दल माहीत असलेच पाहिजे..

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे –

ज्या ग्राहकांना एलपीजी कनेक्शन मिळवायचं आहे त्यांनी स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा पत्ता जाहीर करणं गरजेचं आहे.

योजनेचा लाभ –

10 लाखाहून ज्यांचे उत्पन्न आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता मिळणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. उज्ज्वला योजना सर्वप्रथम 2016 मध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एलपीजी कनेक्शनने जोडण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली, 15 ऑगस्टपर्यंत एकूण 8.03 कोटी कनेक्शन देण्यात आले आहेत. एप्रिल 2021 पर्यंत भारताचे एलपीजी कव्हरेज 99.8 टक्के होते. दिवसामागे 60 लाखाहून अधिक अर्ज पोहचत असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.

वाचा : महाराष्ट्र राज्यात प्रथमच केबल शेडला मिळणार तीन लाख रुपयांपर्यंतचे अनुदान -कृषी आयुक्त

अर्ज असा करा ?

  • उज्ज्वला योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टल (pmuy.gov.in) ला भेट द्या.
  • ते ‘Apply For New Ujjwala 2.0 Connection’ वर पोहोचल्यावर इंडेन, भारत पेट्रोलियम आणि एचपी या तिन्ही गॅस कंपन्यांची नावे दिसतील.
  • तुम्हाला हवी ती कंपनी निवडून आवश्यक तपशील भरा व कागदपत्र पडताळणीनंतर तुम्हाला एलपीजी गॅस कनेक्शन मिळेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button