योजना

व्यावसायिकांसाठी मोठी बातमी: फेसबुक देणार कमी व्याजदराने 50 लाखांपर्यंत कर्ज; पहा सविस्तर

Big news for professionals: Facebook to offer low interest loans up to Rs 50 lakh; See detailed

फेसबुक (facebook) सुद्धा आता भारतातील छोट्या व्यावसायिकांना (Professional) लोन देणार आहे. व्यावसायिकांना 50 लाखापर्यंत लोन घेता येणार आहे. फेसबुकने इंडिफी कंपनी सोबत भागीदारी (Partnership) केली आहे. या लोन ची खास बात ही आहे की अगदी 5 दिवसात लोन आपल्या खात्यावर येणार आहे. येणाऱ्या व्याजावर सवलती देखील मिळणार असल्याचे सांगितले आहे.

फेसबुकच्या घोषणेमुळे अनेक व्यावसायिकांना व्यवसाय (Business) वाढवण्यासाठी मदत होणार आहे. छोट्या लाखो व्यावसायिकांना कर्जासाठी सुविधा उपलब्ध असणार आहेत. फेसबुक ने ही योजना 200 शहरांसाठी सुरू केलेली असल्याचे सांगितले आहे. पार्टनर्स असलेल्या इंडिफी द्वारे ही योजना चालणार आहे. या योजनेचा लाभ शेतकरीही घेऊ शकतात. शेतकऱ्यांना या कर्जाचा (loan) फायदा करून घेयचा असेल तर ते स्वतःच प्रॉडक्ट तयार करून विकू शकतात. स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात.

वाचा- Investment Tip’s : दररोज फक्त सात रुपये बचत करून मिळवा वार्षिक साठ हजार रुपयेपर्यंत पेन्शन!

भारतासाठी तयार केलेली योजना –

सोशल मीडियामध्ये (Social media) फेसबुक टॉप लेवल आहे आणि यानंतर फेसबुक लोन सेक्टर मध्ये भरारी घेत आहे. कंपनीने भारतासाठी (For India) एक घोषणा केली आहे स्मॉल बिजनेस लोन इनीशिटीव्ह योजनेची (Small Business Loan Initiative Scheme) , फेसबुक ने पहिल्यांदा योजना आणली तेही भारतासाठी.

योजनेचे लोन –

फेसबुकने सांगितले आहे की मोरगेज विना व्यापाऱ्यांना (Merchant) हा योजनेचा लाभ घेता येणार नाही. जे व्यावसायिक आहेत त्यांनी फेसबुकद्वारे आपल्या व्यवसायाची जाहिरात करायची आहे. मग त्यानंतर 50 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.

वाचा- Investment Tips : दररोज शंभर रुपये बचत करा आणि पोस्टाचे योजनेतून 10 लाख रुपये मिळवा…

फेसबुक चा इंडिफी कंपणीसोबत करार-

स्मॉल बिजनेस लोन इनिशिटिव्ह योजना (Small Business Loan Initiative Scheme) कार्यान्वित करण्यासाठी फेसबुकने वित्तीय कंपनी इंडीफीसोबत करार केल्याचे सांगितले आहे. आता ही इंडिफी कंपनी कर्ज देणार आहे.

कर्जाचे व्याज किती?

स्मॉल बिजनेस लोन इनिशिएटिव्ह कडून लोन घेतल्यावर 17 ते 20 टक्के व्याज दराने द्यावे लागणार आहे. महिला व्यावसायिकांना 0.2 टाक्यांपर्यंत सवलत मिळणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button