ताज्या बातम्या

Maharashtra Drought | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारकडून ३ हजार कोटींचा प्रस्ताव तयार

Maharashtra Drought | Big news for drought-stricken farmers! A proposal of 3 thousand crores has been prepared by the government

Maharashtra Drought | राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत मिळणार आहे. मदत व पुनर्वसन विभागाने 3 हजार कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. दरम्यान, आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर मंजुरी देण्यात येणार आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या 40 तालुक्यांपैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे आहेत. त्यामुळे विरोधकांनी (Maharashtra Drought) दुष्काळामध्येही सरकार राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. मात्र, सरकारने या आरोपांचे खंडन केले आहे.

वाचा : Pooja Aarti | पूजा-आरती करताना दिवा विझला तर काय? जाणून घ्या सविस्तर …

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 6 हजार ते 20 हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळू शकते. याशिवाय जमीन महसुलात सूट, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंप वीज बिलात सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, पीक कर्जाचे पुनर्गठन, वीज जोडणी न खंडित करणे आदी सवलतींचा लाभ यामुळे मिळणार आहे.

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात दुष्काळ जाहीर करायचा झाल्यास पर्जन्यमान कमी झालेली गावे विभागीय महसुली मंडलनिहाय निवडण्याची शक्यता आहे. याबाबत सरकार निर्णय घेणार आहे. यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेण्यात येणार आहे.

हेही वाचा :

Web Title : Maharashtra Drought | Big news for drought-stricken farmers! A proposal of 3 thousand crores has been prepared by the government

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button