ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
बाजार भाव

मोठी बातमी, ‘या’ ठिकाणी मेथी १३० रुपयाला; शेतकऱ्यांचा कल मेथी लागवडीकडे ..

गेल्या महिन्यात अनेक ठिकाणी शेतीचे भाज्या पाल्यांचे नुकसान होताना आपण पाहिले आहे. कित्येक भाजीपाला फळे उद्ध्वस्त झाली. याचा फटका सर्व शेतकऱ्याना बसला. या महापूरच्या परिस्थिति नंतर अचानक भाज्या पाल्यांचे दर वाढले तेही चक्क मेथी १३० रुपयाला. या दरांविषयी आपण सविस्तर माहिती घेवूया..

वाचा –

बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर काही शेतकऱ्यांची पिके सुरक्षित राहिली. सध्या अचानक भाज्यांचे दर शिगेला पोहचलेले पाहायला मिळत आहेत. हिंगोलीत भाज्या पाल्यांचे दर शिगेला पोहचले आहेत. हिंगोली शहरात भाजी मंडईमद्धे मेथी, गोबी, दोडके, कारले यासोबत कोथिंबीर चे दर ही प्रचंड वाढलेले आहेत. जुडीने मेथी विकली जाणारी आज तब्बल १२० ते १३० रुपये किलोने दराने विकली जात आहे.

भाज्यांची टंचाई पाहता दरही तितकेच वाढलेले दिसून येत आहेत. पावसाच्या वातावरणामुळे सुद्धा भाज्यांची नासाडी होत असताना पाहायला मिळते. भाज्यांची टंचाई व दर पाहता शेतकरी पुन्हा भाज्यापाल्यांच्या लागवडीकडे वळलेला दिसून येत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button