मोठी बातमी; शेतकऱ्यांनो तुमच्या गावातील तसेच शहरातील जमिनीचे सरकारी दर पहायचे आहेत? तर असे तपासा…
शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांनो तुमची जमीन एखाद्या सरकारी प्रकल्पात जात असेल जसे की महामार्ग, धरणं किंवा इतर कामांमध्ये जात असेल तर त्या जमिनीचं सरकारी बाजारमूल्य माहिती असणं गरजेचं असतं. हे दर कसे तपासायचे सविस्तरपणे जाणून घेऊया..
वाचा –
जमिनीची खरेदी-विक्री (Buying and selling of land) करतानाही आपल्या भागातील जमिनीचा सरकारी दर माहीत असणे गरजेचे आहेत. तसेच एखाद्या शहरात आपल्याला दुकानासाठी किंवा ऑफिससाठी गाळा खरेदी करायचा असेल, तर त्या भागातील जमिनीचा सरकारी दर माहिती असणं आवश्यक असतं. घरबसल्या 5 मिनिटांत महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांतील जमिनीचे सरकारी दर पाहू शकता. ते कसे याचीची माहिती आपण आता पाहूया.
गावातील जमिनीचा सरकारी दर असा तपासा –
1) जमिनीचे सरकारी दर (Government rates for land) पाहण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला igrmaharashtra.gov.in या लिंक वर जायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. या वेबसाईटवर (Website) डावीकडे महत्त्वाचे दुवे हा रकाना दिसेल. यातील मिळकत मूल्यांकन या पर्यायावर क्लीक करा. यानंतर बाजारमूल्य दर पत्रक नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर महाराष्ट्राचा नकाशा दिलेला असेल. तुम्हाला ज्या जिल्ह्यातील जमिनीचा शासकीय भाव पाहायचा आहे, त्या जिल्ह्याच्या नावावर क्लीक करा. त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
2) या पेजवर सगळ्यात आधी डावीकडे Year या रकान्यात तुम्हाला वर्षं निवडायचं आहे. चालू वर्षासाठीचे दर पाहायचे असेल मी 2021-22 हे वर्षं निवडा. तिथे उजवीकडे असलेल्या Language या रकान्यात जाऊन तुम्ही मराठी भाषा निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही निवडलेल्या जिल्ह्याचं नाव दिसून आपोआप आलेलं दिसेल. पुढे तालुका आणि गावाचं नाव निवडा. गावाचं नाव निवडलं की खाली तुम्हाला तुमच्या गावातील जमिनीचे सरकारी भाव दिसतील.
3) यात सुरुवातीला Assessment type मध्ये जमिनीचे प्रकार दिसतील. या प्रकारानुसार पुढे Assessment range आणि रेट म्हणजेच जमिनीचा सरकारी भाव दिलेला असेल. ही जी किंमत इथं दिलेली असते ती प्रतीहेक्टरी असते. अशाप्रकारे जिरायत, बागायत, एमआयडीसी अंतर्गत येणारी जमीन, हायवेवरील जमिनी याचे सरकारी दर तुम्ही इथे पाहू शकता.
वाचा – एसबीआय बँकेची शेतकऱ्यांसाठी मोठी योजना; आता मिळणार त्वरित ट्रॅक्टर लोन..
Assessment range काय भानगड आहे?
इथे Assessment range नुसार जमिनीचे भाव कमी किंवा जास्त होताना दिसतात. तुमच्याकडे तुमचा सातबारा उतारा असेलच. त्यात संबंधित शेतकऱ्याच्या नावासमोर त्याच्याकडे असलेलं जमिनीचं क्षेत्र आणि त्यापुढे आकार दिलेला असतो. Assessment range काढण्यासाठी तुम्हाला आकार भागिले क्षेत्र असं सूत्र वापरायचं आहे. एकदा का ही Assessment range काढली, की मग ती कोणत्या रेंजमध्ये बसते, ते पाहून तुम्ही तुमच्या गावातील जमिनीचा सरकारी भाव जाणून घेऊ शकता.
शहरातील जमिनीचा दर असा पाहा –
बाजारमूल्य दर पत्रक या पेजवर परत या. जिल्हा निवडून तालुका आणि गावाचं नाव टाका. सुरुवातीला सर्व्हे नंबरवर क्लिक केलं की त्या उपविभागात कोणकोणते सर्व्हे नंबर येतात, त्याची नावं खाली येतील. प्रती चौरस मीटर या एककानुसार जमिनीचे दर दिलेले आहेत. खुली जमीन असेल तर 14300 रुपये प्रती चौ.मी, निवासी सदनिका 30500 रुपये, ऑफिस 35500 रुपये, दुकाने 53000 रुपये असे प्रती चौरस मीटरनुसार जमिनीचे सरकारी भाव दिलेले आहेत.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा