कृषी बातम्या

मोठी बातमी; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमासह “एसडीआरएफ” मधून मिळणार मदत, पहा सविस्तर माहिती..

नुकसानग्रस्त शेतकरी व सर्वसामान्य जनतेला आधार मिळणार आहे. पिक विम्याच्या भरपाई बरोबरच राज्य आपत्ती निवारण निधी (State Disaster Relief Fund) च्या निकषाप्रमाणे जिल्ह्यातील जवळपास अतिवृष्टीची झळ बसलेले सर्व शेतकरी (Farmers) पात्र ठरत आहेत. आणि ही मदत राज्य शासनाने घोषित केल्यानंतर सर्व शेतकर्‍यांना (Farmers) मिळू शकणार असल्याचे सांगितले आहे. शेतकऱ्यांना पिकविमाची भरपाई (Crop insurance compensation) मिळावी यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यात याव्यात हाच या बैठक घेण्यात आली. याविषयी सविस्तर माहिती घेऊया..

वाचा –

५ लाख शेतकऱ्यांची पीक विम्याची नोंदणी –

जिल्ह्यात (district) पूरस्थिती आणि अतिवृष्टीने झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये जिल्ह्यातील 11 लाख 66 हजार शेतकरी सभासदांपैकी जवळपास ५ लाख शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे म्हणून पीक विम्याची नोंदणी केली आहे.

तसेच ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला नाही त्यांनाही नुकसानीची सरसकट मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

वाचा –

यंत्रणांनी लवकर काम केले पाहिजे – धनंजय मुंडे

बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्याचे (Farmers) अतिप्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील असंख्य गावांचा, पाणीपुरवठा, वीज पुरवठा देखील बंद झाला. बंधारे, केटीवेअर यांचे नुकसान झाले आहे. गावांमध्ये जाण्यासाठी तसेच अगदी स्मशानभूमीत देखील जाण्यासाठी रस्ते राहिलेले नाहीत.

या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सर्व शासकीय व कार्यान्वयन यंत्रणांनी वेगवान काम केले पाहिजे व सुविधा आधीसारख्या केल्या पाहिजेत यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक बांधकाम अशा ज्या यंत्रणेचा निधी वापरता येईल तो वापरावा, कागदोपत्री प्रक्रियेत वेळ न घालवता तातडीने कामे सुरू करावीत, असे आवाहन मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button