कृषी बातम्या

मोठी बातमी; शेतकरी आपली जमीन थेट सरकारला विकू शकतात, काय आहेत किमती? पहाच..

Big news; Farmers can sell their land directly to the government, what are the prices? See you

शेतजमीन (Farm land) विक्रीसाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तींसाठी सरकारने (government) एक योजना (scheme) आणली आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना (farmers) आपली शेतजमीन थेट सरकारला (government) विकता येईल. विकावी अशी अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांनी (farmers) विहित नमुन्यात अर्ज सादर करावे लागणार आहेत. ही माहिती सादर करण्यास सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नाशिक सुंदरसिंग वसावे यांनी सांगितले आहे.

वाचा –

अशी मिळेल किंमत

जिरायत जमिनीसाठी प्रति एकर 5 लाख रुपये तर बागायती जमिनीकरिता प्रति एकर 8 लाख रुपये इतक्या कमाल मर्यादेपर्यंत खरेदी करण्याबाबत 14 ऑगस्ट 2018 च्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार निर्देशित केले आहे.

वाचा –

असा करा अर्ज –

1) अर्ज सहायक आयुक्त समाज कल्याण नाशिक, सामाजिक न्याय भवन, बी विंग, 2 रा मजला, नासर्डी पूल नाशिक कार्यालयात सुटीचे दिवस वगळून उपलब्ध करून घेता येणार असल्याचे सांगितले आहे
2) या अर्जासोबत 7/12 उतारा, 8 अ उतारा व दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयाकडील मुल्यांकन पत्रक इत्यादी कागदपत्र जोडा.
3) अधिक माहितीसाठी वरील पत्यावर किंवा दूरध्वनी क्रमांक 0253-2975800 यावर संपर्क साधा.

हे ही वाचा-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button