मोठी बातमी: इलेक्ट्रीक वाहन धोरण अनुदान लागू; पहा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
Big News: Electric Vehicle Policy Grants Implemented; See How to apply for benefits?
वातावरणामुळे होणारे बदल तसेच वाढत असलेले प्रदूषण, हे सर्व नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून इलेक्ट्रीक वाहन धोरण 2021 लागू करण्यात आलेले आहे. जे 25 जुलै 2021 पासून राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे. या धोरणाच्या अंतर्गत इलेक्ट्रीक वाहन (Electric vehicles) किंवा बँटरी खरेदी (Buy a battery) करण्यासाठी इच्छुक खरेदीदार किंवा इच्छुक लाभार्थी असतील यांना वाहनांच्या बॅटरी च्या क्षमतेनुसार अनुदान इंसेंटिव्ह दिले जाणार आहे. 25 जुलै 2021 रोजी धोरण लागू होऊन सुद्धा अजूनही शोरूम कंपन्यांच्या माध्यमातून अनुदानासाठी अर्ज घेतले नव्हते. कारण याच्या मार्गदर्शक सूचना तेव्हा मंजूर झाल्या नव्हत्या.
वाचा – कोकण, गोवा, मराठवाडासह “या” ठिकाणी पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस..
महाराष्ट्राचे इलेक्ट्रीक व्हेईकल प्रोत्साहन धोरण- 2018 हे संदर्भाधीन शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आले आहे. धोरणाच्या तरतुदींनुसार बॅटरी इलेक्ट्रीक व्हेईकल ( BEV) च्या खरेदीदारांसाठी आर्थिक प्रोत्साहन अनुदेय केली आहेत. तसेच या धोरणाच्या तरतुदीनुसार इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग (Electric vehicle charging) स्टेशनसाठी द्यावयाची आर्थिक प्रोत्साहन वाटप करण्यासाठी नवीन सूचना देण्यात आल्या आहेत. या बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रीक वाहनांवरती अनुदान देण्यासाठी अनुदान पद्धतीने अर्ज कसा करायचा पाहूया..
पात्रता –
प्रोत्साहन फक्त बॅटरी इलेक्ट्रिक (Battery electric) वाहनांसाठी (BEV) साठी असेल जे महाराष्ट्रात पहिल्यांदा नवीन वाहन म्हणून विकले जाते आणि महाराष्ट्र राज्याच्या आरटीओकडे बीईव्ही (BEV) म्हणून नोंदणीकृत असते. पॉलिसी कालावधी दरम्यान OEM प्रोत्साहन (बीईव्हीच्या प्रत्येक श्रेणीमध्ये म्हणजे दोन, तीन, चारचाकी आणि ई – बस) साठी पात्र असतील. वाहनाच्या बॅटरी क्षमतेच्या आधारावर सबसिडी दिली जाणार (INR/KWW).
ऑनलाइन अर्ज –
लाभार्थ्याने रजिस्टर आणि ऑनलाइन फॉर्म di.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर भरायचा आहे जो पर्यंत या विभागाच सेपरेट संकेतस्थळ सुरू होत नाही. पोर्टल सुरू झाल्यानंतर त्यावर अर्ज भरले जातील. या अर्जासोबत काही कागदपत्रे, स्कॅन कॉपी लागणार आहेत. पुढील प्रोसेस करून अर्जाची प्रोसेस पूर्ण करा.
वाचा –पॉवर ट्रीलर अनुदान साठी अर्ज करायचा आहे, तर वाचा सविस्तर व घ्या योजनेचा लाभ..
सबसिडी कशाप्रकारे दिली जाणार –
प्रस्ताव दिल्यानंतर 15 दिवसाच्या कालावधीमध्ये सबसिडी दिली जाणार आहे. वाहनांसाठी दिल्या जाणाऱ्या सबसिडीची माहिती सुद्धा दिली गेली आहे. खालीलप्रमाणे..
1) ई -2 डब्ल्यू (एल 1 आणि एल 2) जास्तीत जास्त सबसिडी 1,00,000 दिली जाणार आहे, ही 10,000 वाहनांसाठी दिली जाणार आहे.
2) ई -3 डब्ल्यू ऑटो (एल 5 एम) कमीत कमी 15,000 वाहनांसाठी, 30,000 सबसीडी दिली जाणार आहे.
3) ई -3 डब्ल्यू माल वाहक (L5N) 10,000 वाहनांसाठी, 30,000 सबसिडी दिली जाणार आहे
4) ई -4 डब्ल्यू कार (एम 1) 10,000 वाहनांसाठी, 1,50,000 सबसिडी असणार आहे.
5) ई -4 डब्ल्यू माल वाहक (एन 1) 10,000 वाहनांसाठी, 1,00,000 सबसिडी असणार आहे..
6) ई-बस च्या 10% वाहन किंमत 1,000 वाहनांसाठी 20,00,000 सबसिडी दिली जाणार आहे.
वाचा– तब्बल ३०० च मायलेज: पेट्रोल-डिझेल पासून सुटका, सर्वसामान्यांना देखील परवडणारी आली इलेक्ट्रॉनिक कार..
तसेच शासनाला इ-बसेस (E-BUS) साठी 20 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. अनुदान मागण्यासाठी एक प्रतिज्ञापत्र देयचे आहे, नमुना देखील देण्यात आला आहे तो भरून देयचा आहे. शासन निर्णय www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर पाहायला मिळेल. संकेतस्थळावर जाऊन सविस्तर पाहू शकता.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :