शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता राहिलेल्या शेतकऱ्यांना पण लवकरच कर्जमुक्ती मिळणार. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत २२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ५३ हजार ७०९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३१४ कोटी ४४ लाखांचा निधी वर्ग करण्यात आला. ही प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांंनी तातडीने कर्जमुक्त व्हावे, यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालय जनजागृतीसाठी सरसावला आहे. ९०० शेतकऱ्यांंनी आधार प्रमाणिकरण न केल्याने ही प्रकरणे प्रलंबित आहेत.
वाचा –
सहकार, पणन, व वस्त्रोद्योग विभागाच्या ७ डिसेंबर २०१९ च्या निर्णयानुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ कालावधीत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांंसाठी कर्जमुक्ती योजना सुरू झाली. चंद्रपूर जिल्ह्यात २२ ऑक्टोबर २०२१ अखेर पोर्टलवर ५९ हजार ३४१ खाती अपलोड करण्यात आली.
वाचा –
५३ हजार ७०९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले –
विशिष्ट क्रमांकासह ५५ हजार ६३० पात्र खाती प्राप्त झाली. त्यापैकी ५४ हजार ७४३० शेतकऱ्यांंचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले. त्यामुळे २२ ऑक्टोबर २०२१ अखेर ५४ हजार ७३० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेल्यांपैकी ५३ हजार ७०९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. त्यांच्या बँक खात्यावर ३१४ कोटी ४४ लाख वर्ग करण्यात आले. मात्र, ९०० शेतकऱ्यांंनी प्रमाणीकरण न केल्याने त्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत. १५ ऑक्टोबर २०२१ ते १५ डिसेंबर २०२१ या कालावधीत प्रलंबित आधार प्रमाणीकरण व तक्रारींच्या निराकरणासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आधार प्रमाणीकरण प्रलंबित शेतकऱ्यांच्या याद्या बँक शाखा, विका, सेवा, आविका संस्था कार्यालय व ग्रामपंचायतमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा